अकोला दिव्य न्युज ब्युरो : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा आज 13 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित निकालात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, रिधोरा शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावत शाळेच्या लौकिकात भर टाकली आहे. शाळेच्या निकालाची टक्केवारी शतप्रतिशत असल्याने श्री समर्थ स्कूल अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा अधोरेखीत करणारी ठरली आहे.समर्थ पब्लिक स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते.यावर्षीचा दहावी व बारावीचा उत्कृष्ठ निकालाने ही परंपरा अबाधित ठेवली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावीतून स्वराज तायडे ९५.८० टक्के, सिमरण चोरे ९५.०६, मंदार जोशी ९५.०२, श्रेयश वाकले ९४.०६, सृष्टी निखारे ९३.०८, समृध्दी बघेल ९३.०२, क्षितीज वाघ ९२.०८, पार्थ टाले ९२.०२, यश राठोड ९०.०८, गौरी जोशी ९०.०६ ,पायल ढेंगे ८९.०६,तेजस ठाकरे ८७.०८,अर्णव बालिंगे ८७.०४, अथर्व महल्ले ८५.०८, गौरी दांदळे ८५.०८ हे विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले आहेत.
बारावीमध्ये अरिबा अश्रर, हर्ष त्रिपाठी, प्रथमेश तांदळे, संस्कृती टोले या विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेत शाळेचे नाव उंचावले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, संचालिका प्रा.जयश्री बाठे, संचालक प्रा.राजेश बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्रा.योगेश जोशी, प्रा.किशोर रत्नपारखी, प्रा.डाॅ.जी.सी.राव, सुवर्णा गुप्ता, प्राचार्या अश्विनी थानवी यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.