अकोला दिव्य न्यूज : प्रभात किड्स स्कूलची रायफल शुटर अनुश्री उईकेने अमरावती येथे झालेल्या विभाग स्तरावर रायफल शुटींग स्पर्धेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय रायफल शुटींग स्पर्धेचे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमराती येथे ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते.या स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये अनुश्री उईके हिने ओपन साईट प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. अनुश्रीला ज्येष्ठ रायफल शुटींग मार्गदर्शक विन्सेंट अमेर व प्रभातच्या क्रीडा प्रशिक्षक कोमल यादव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांनी अनुश्रीचे कौतुक केले असून प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.