अकोला दिव्य न्युज ब्युरो : काही आजारांवरील उपचार हे रुग्ण आणि नातेवाईकांच्या आटोक्यात नसतात तर इतरांच्या सहकार्याने त्यावर काही प्रमाणात मात करता येऊ शकते. अशा आजारांपैकी थॅलेसिमीया हा एक आजार आहे. या आजारांवरील उपचारासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, हवं तेवढ्या प्रमाणात याकडे लोकांचे लक्ष नाही. लोकांमध्ये याकरिता मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे काळाची गरज आहे. आज ८ मे रोजी संपूर्ण जगभरात थॅलेसिमिया दिवस साजरा करण्यात येत असताना आणि. पश्चिम विदर्भातील थॅलेसिमीया आजाराच्या रुग्णांचा उपचारासाठी मोठे केंद्र अकोला येथे सक्षमपणे कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला येथील राजश्री राजेश सोमाणी यांनी ‘थॅलेसिमीया आणि उपाय’ विषयावर राज्य पातळीवर प्रथम आणि राष्ट्रीय पातळीवर द्वितीय पुरस्कार पटकावत अकोला शहराचे नावलौकिक केले.
जागतिक थॅलेसिमीया दिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय मारवाड़ी महिला संमेलन आणि राष्ट्रीय थॅलेसिमीया वेलफेयर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मारवाड़ी संमेलनाच्या अंगदान-नेत्रदान राष्ट्रीय समितीद्वारे राज्य ते राष्ट्रीय पातळीवर स्व:रचित भाषण (वीडियो मेकिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.भारतभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अकोला येथील राजश्री राजेश सोमाणी यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय पातळीवर देखील द्वितीय पुरस्कार पटकाविला.
राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराची घोषणा होण्याअगोदर महाराष्ट्राच्या अध्यक्षा अनुराधा अग्रवाल यांनी महाराष्ट्रातील विजेता स्पर्धकाची निवड केल्यानंतर, राष्ट्रीय पातळीवरील परिक्षकांनी राजश्री सोमाणी यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठीही निवड केली. अशी घोषणा अखिल भारतीय मारवाड़ी महिला संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अंजू श्रावगी यांनी केली. राष्ट्रीय पातळीवर राजश्री सोमाणी यांनी द्वितीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. आपल्या उद्बोधनात सोमाणी यांनी या आजाराबद्दल आवश्यक माहिती, त्यासाठीची खबरदारी तसेच उपचार पध्दत आणि लोकांच्या सहभागाची गरज का? याबद्दल अमोघ वाणीतून जनजागृती केली.
अखिल भारतीय मारवाड़ी महिला संमेलन अकोला शाखा अध्यक्ष अनिता उपाध्याय, सचिव अंजली उपाध्याय, कोषाध्यक्ष रमा चांडक आणि अवयवदान,नेत्रदान समिति प्रमुख सुलोचना सिंगी व छाया खंडेलवाल यांच्यासह ABMM च्या सर्व सदस्यांनी राजश्री सोमाणी यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय अध्यक्ष अनीता उपाध्यायसोबत सर्व पदाधिकारी व सदस्यांना दिले.यापुर्वीही अवयवदान आणि त्वचा दान संबंधित जनजागृती स्पर्धेत राजश्री सोमाणी यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविले आहे.