अकोला दिव्य न्युज ब्युरो : महिलांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी राजस्थानी लोकगीत, अंबाबाईची गाथा व रास गरबा, महाराष्ट्रातील संस्कृती आणि ‘आमची संस्कृती, आमचे संस्कार’ या मालिकेतील गणेश वंदना पासून रामायणापर्यंतच्या विविध भागांचे सादरीकरण,असे भरगच्च कार्यक्रम आज मंगळवार ७ मे रोजी आयोजित करण्यात आले आहेत.
भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा कायम ठेवून, यंदा श भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आज मंगळवारी ७ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रमिलाताई ओक सभागृहात महिलांनी नियोजनबध्द पध्दतीने तयार केलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ब्राह्मण समाजातील स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ब्राह्मण ऐक्य अबाधित ठेवावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
उद्या बुधवार ८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता डॉ. वसुधा विनोद देव यांचे भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व शोभायात्रा नियोजन बैठक खंडेलवाल भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार ९ मे रोजी परशुराम जन्मोत्सवाच्या पूर्व संध्येला भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथुन संध्याकाळी ५ वाजता मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा मार्गस्थ होऊन खोलेश्वर येथूनच
भव्य शोभायात्रा काढण्यात येणार.त्यानंतर पारितोषीक समारंभ होऊन रात्री ८ वाजता मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालय निमवाडी येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा शुक्रवार दि.१० मे रोजी रोजी सकाळी ११ वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम मंदिरात होणार आहे. यावेळी परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा करुन महाआरतीने कार्यक्रमांची सांगता करण्यात येणार आहे.
ब्राह्मण समाजबांधवांनी आयोजित सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन संयोजक अशोक अंबादास शर्मा (लोणाग्रावाले) विजय तिवारी, उदय महा, गिरीश गोखले, मोहन पांडे, कृष्णा गोवर्धन शर्मा, रामप्रकाश मिश्रा, निलेश देव, पंडित हितेश मेहता, राकेश शर्मा, देवेंद्र तिवारी, राजेंद्र तिवारी, आनंद शास्त्री, कुशल सेनाड, पंडित अमोल चिंचाळे, अक्षय गंगाखेडकर, विवेक शुक्ला, राजेश व्याम्बरे, गोपाल राजवैद्य आणि भगवान परशुराम जन्मोत्सव समितीने केले आहे.