अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी हे सत्य त्यावेळी न्यायालयापासून लपवून ठेवले.असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच काँग्रेसचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे. असे विधान वडेट्टीवार यांनी करीत अँड निकम यांना काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा, असं आवाहन केले आहे.
या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी न्यायालयामध्ये जे पुरावे सादर करायला हवे ते उज्ज्वल निकम यांनी सादर केले नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन राजकारण तापले आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिलेले आहे. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या मैदानात आहेत. सध्या प्रचार जोरदार सुरू असून विजय वडेट्टीवार यांच्या विधानाला आता भाजपाचे नेते काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.