अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्तम गुण प्राप्त करून घवघवीत यशाचा डंका वाजवला आहे. इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षा जेईई मेनचा नुकताच्या जाहीर झालेल्या निकालात श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या यशाची परंपरा कायम राखत सर्व विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्रा. नितीन बाठे आणि वर्गा मधील देश पातळीवरील स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले उच्चशिक्षित मार्गदर्शक प्राध्यापकांना दिले आहे.नियमित डाऊट बॅचेस व सराव परीक्षा, पेपर डिस्कशन, डिजिटल क्लासरूम, व्ही आर सिस्टीम, अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास लेक्चर्स, तसेच क्लासेस मध्ये असलेले प्रत्येक विषयासाठी ४ ते ५ अनुभवी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रा. नितीन बाठे यांचे मार्गदर्शन आणि अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग यांच्या सखोल अनुभवामुळे विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा प्रियांक पटेल याला फिजिक्स सारख्या कठीण विषयात १०० पसेंटाइल मिळाले असून त्याचा एकंदर पसेंटाइल ९९.३६ आहे. यामुळे त्याने आपला नाव राष्ट्रीय पातळीवर लौकिक केला आहे.
श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या जेईई मेन परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष गुप्ता ९९.५८ पसेंटाइल, कृष्णा गुप्ता ९९.३९, प्रियांक पटेल ९९.३६. पार्थ रत्नपारखी ९८.३०, शितल बराटे ९४.२२, उज्ज्वला पाटील ९३.८६, अर्पण आखरे ९२.६३, योगेश सहस्त्रबुद्धे ९१.१८, अभिषेक कावरे ९०.८९, वेदांत अग्रवाल ९०.४२, अजित राजगुरू ८८.९९, ऐश्वर्या उमक ८८.६४, उदय पाचपोर ८६.३६, अभिषेक मोरखडे ८५.२७ सह उज्वल गिरी ८४.४२, राम पवार ८२.७०, अभय उजाडे ८२.४२, ऋषिकेश धरमकर ८१.८९, समीक्षा रोकडेला ७९.९९ पसेंटाइल मिळाले आहेत. हे सर्व विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.