Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीअकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख रुपयांत विक्री करण्यात आली. मुलीची आई व मामाने संगनमताने मुलीची विक्री केली. काही व्यक्ती या मुलीस धामणगाव रेल्वे मार्गे राजस्थानला घेवून जात असताना यवतमाळ शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका करून आंतराज्यीय टोळीला जेरबंद केले. याप्रकरणी मुलीची आई, मामा व राजस्थानातील चौघे, अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री शहरातील धामणगाव चौफुली येथे करण्यात आली.या घटनेने विदर्भात अल्पवयीन मुलींची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता बळावली आहे.

अकोला येथील शिवणी भागातील मच्छी मार्केट येथे रहाणारी इम्तीयाजबी सरदारखॉ पठाण (५०) आणि टेम्पोचालक असलेला भाऊ अस्लमखॉ तस्वरखॉ पठाण याला सोबतीला घेऊन एक लाख रुपयात आपल्या मुलीला राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील करनीजी टेंपल, तारा नगर येथे रहाणारा शंकर सिंह सोहन सिंह (२८) याला विकले व अल्पवयीन मुलीच्या मामाने यवतमाळच्या मोमीनपुरा येथील घरात या दोघांचा विवाह लावून दिला. त्यासाठी आईचे व तिचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले. दरम्यान मुलीस शुक्रवारी सायंकाळी काही व्यक्ती खासगी टेम्पोने धामणगाव रेल्वे मार्गे राजस्थानात नेत असल्याची गुप्त माहित यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धामणगाव चौफुलीवर नाकाबंदी करून, एम. एच २९, एम ३७६६ या क्रमांकाचा टेम्पो अडवून त्यातील व्यक्तींची विचारपूस केली. तेव्हा त्यात पाच पुरुष, एक महिला व एक अल्पवयीन मुलगी प्रवास करत असल्याचे आढळले. पोलिसांनी मुलीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता, मुलीने अशी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.

यात सत्तार मोहम्मद बैजीरदीन लोहार, ताज मोहम्मद बैजीरदीन लोहार, अब्दुल कमरूद्दीन भडमुन्जा यांनी दलाली केल्याचा आरोप मुलीने केला आहे. या तिघांनी तिच्या आईचे हिंदूधर्मीय असल्याचे बनावट आधारकार्ड तयार करून, तिचे नाव कविता दीपक अग्रवाल असल्याचे नमूद केले. बनावट आधार कार्डवर मुलीचे नाव सविता दीपक अग्रवाल असे नोंदविले.या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल रावसाहेब दामोदर शेंडे यांनी यवतमाळ शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शंकरसिंह सोहनसिंह, सत्तार मोहम्मद बैजीरदीन लोहार (राजस्थान), ताज मोहम्मद बैजीरदीन लोहार (राजस्थान), अब्दुल कमरूद्दीन भडमुन्जा (राजस्थान), अस्लमखॉ तस्वर खॉ पठाण (यवतमाळ) आणि ईम्तीयाजबी सरादर खॉ पठाण ( शिवणी अकोला) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!