अकोला दिव्य न्युज ब्युरो : समर्थ इंग्लिश स्कूलचा मधिल प्रत्येक विद्यार्थ्यानी शिक्षणासह सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालावी. उत्तुंग व्यक्तिमत्वासह अकोला जिल्हा, पालक व शाळेचे नाव उज्वल करावे, या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांसाठी ‘गणित’या विषयाचे विदर्भातील प्रख्यात व अभ्यासू मार्गदर्शक प्रा.नितीन बाठे यांनी ‘श्री समर्थ शिक्षण संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये,वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारुन समाजसेवेचा वसा अंगिकारला आहे. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून जागतिक शिक्षण प्रणालीशी विद्यार्थ्यांची नाळ अधिकाधिक घट्ट व्हावी, या दृष्टीने थेट हैद्राबाद येथील शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व प्राचार्य डाॅ.जी.सी.राव यांच्या मार्गदर्शनात २०२४-२०२५ या नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली आहे.
येथील श्री समर्थ शिक्षण संस्था व्दारा संचालित ‘श्री समर्थ पब्लिक स्कूल’च्या सर्वच ब्रँचच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, शिक्षण, सुसंस्कार आणि सर्वांगीण विकास घडविणार्या समर्थ स्कूल परिवारामध्ये अनेक देशांमध्ये प्राचार्य,एज्युकेशन मार्गदर्शक, सल्लागार, डायरेक्टर, प्रशिक्षक म्हणून सलग ३० वर्षांचा अनुभव असलेले आंध्रप्रदेश राज्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ.जी.सी.राव यांची श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या ‘एज्युकेशनल डायरेक्टर’ पदी नियुक्ती संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांनी केली आहे.
डाॅ.जी.सी.राव हे राज्यशास्त्र, इतिहास, इंग्रजी या तीन विषयांमध्ये एम.ए.आणि रसायनशास्त्र विषयामध्ये एमएस्सी या पदव्युत्तर पदव्यांसह पीएच.डी.ही उपाधी संपादन केली आहे. तीस वर्षांपासून देशविदेशातील रेसिडेंशल बोर्डिंग स्कूल व रेग्युलर शाळांमध्ये आपल्या अनुभवाने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सर्वच बाबतीत शिस्तही लावली आहे.
आजवर त्यांनी प्राचार्य,डायरेक्टर पद भुषविलेल्या शाळांपैकी दिल्ली पब्लिक स्कूल, केसीपी सर पब्लिक स्कूल, बिर्ला पब्लिक स्कूल, दोहा-कतार; एस.व्ही.रेसिडेंशल स्कूल, तिरुपती, डाॅ.डी.वाय.पाटील स्कूल, कोल्हापूर, पुणे,नागपूर, जेएसएस इंटरनॅशनल स्कूल, दुबई यांसह अबूधाबी, शारजहाॅ, उमाल बवेन, सिंगापूर, लंडन इत्यादी अनेक देशांतील स्कूल अध्यापन, प्रशासन,व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव आहे.अशा अनुभवसंपन्न प्रा.डाॅ.जी.सी.राव यांची नियुक्ती समर्थ परिवारासाठी मोठी उपलब्धी असल्याची भावना प्रा.नितीन बाठे यांनी व्यक्त केली.