अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणुन विविध अफवा व हिंदु- मुस्लिम यांच्यात द्वेष पसरविण्याचे काम सुरू केले आहे. असा गंभीर आरोप प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी केले आहे. देशभरात सुरू असलेल्या भाजपच्या द्वेषाचा राजकारणात सामान्य व्यक्ती होरपळून निघत असून, याची अकोला जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला याची पुरेपूर जाणीव झाली आहे. अकोला मतदारसंघात पुसरविल्या जात असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता, मतदार खंबीरपणे कॉंग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. यंदा सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने, जातीपातीच्या भिंती पाडून डॉ. अभय पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे, असा दावा ढोके यांनी केला आहे.
सातत्याने मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवणे व हिंदुंच्या धार्मिक भावना भडकवत, भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. परंतु अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक जाहीर होताच आपला निर्धार पक्का केला आहे. हे आता भाजपला कळून चुकल्यावर भाजपाचे किशोर पाटील, जयंत मसने व शाम बडे यांनी धादांत खोटे व बिनबुडाचे आरोप लावणे सुरू केले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कुठेही केले नाही, असे वक्तव्य मात्र डॉ सिंग यांनी केले असल्याचे या तिघांनी सांगितले आहे. तेव्हा याबद्दलचे पुरावे तिघांनीही सादर करावे अन्यथा दिशाभुल केल्या प्रकरणी जनतेची माफी मागावी, असे आवाहन ढोके यांनी केले.
सतत धार्मिक अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भाजपच्या कपटी राजकारणाला कंटाळून, भकास झालेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी रोजगार, व्यापार उद्योग क्षेत्रात विविध नवीन उद्योग समुहाची स्थापना व सामाजिक एकोपासाठी डॉ पाटील यांना पहिली पसंती दिली आहे.असं प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी सांगितले आहे.
देशातील एस.सी, एसटी, अल्पसंख्यांक व आदिवासींचा भाजप कायमस्वरूपी द्वेष करत आली आहे.म्हणुन पंतप्रधान मोदी व भाजपवाले संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. तर यंदाच्या अकोला मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाच्या दंगलखोर राजकारणाला कुठल्याही स्थितीत बळी पडणार नाही.असा निर्धार तमाम अकोलेकरांनी केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी ‘अफवा पसरवा’ अजेंडा राबविण्याला सुरुवात केली आहे. सर्वच समाजातील मतदारांचा मन-भेद व बुध्दी भेद करण्याचा घृणास्पद प्रयत्न करीत आहे. परंतु अशा अफवांना बळी न पडता कॉंग्रेसव महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन कपिल ढोके यांनी केले आहे.