Sunday, November 24, 2024
Homeअकोला जिल्हारडीचा डाव! डॉ.अभय पाटलांच्या संदर्भात न्युज चॅनलच्या स्क्रीन शॉटवर खोटी बातमी केली...

रडीचा डाव! डॉ.अभय पाटलांच्या संदर्भात न्युज चॅनलच्या स्क्रीन शॉटवर खोटी बातमी केली व्हायरल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसत असल्याने की काय, त्यांच्या हितशत्रूंना पोटशूळ होतं असल्याचे एका प्रकरणाने उघडकीस आले आहे. याबाबत अकोला लोकसभा निवडणूक अधिकारी आणि अकोला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते.पण अशी खालच्या पातळीची मानसिकता नको, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा चुरशीची लढत होत असून पहिल्या टप्प्यापासून कॉंग्रेस उमेदवार डॉ.अभय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यंदाचा सामना काट्याचा होईल, अशी मतदारसंघात सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान काल अकोला शहरात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेचा धागा पकडून डॉ. अभय पाटील यांनी अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बातचीत करण्याचं सांगितले. अशा आशयाची वाक्य टाकून, एका प्रतिष्ठित मराठी न्यूज चॅनलचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.हा प्रकार शुद्ध धुळफेक आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बातमी या न्युज चॅनलवर प्रसारित झाली नाही, असा निर्वाळा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे दुस-या कुठल्यातरी बातमीचा स्क्रीन शॉट घेऊन, त्यावर हा मजकूर पेस्ट केला आहे.हे प्रथमदर्शनीच स्पष्ट होते. दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या नावाने “कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर पाकिस्तनला 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज देऊ ” असा मजकूर असलेले स्क्रीन शॉट व्हायरल करण्यात आले होते. ते निखालस खोटे व बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आता डॉ.पाटील यांच्याबद्दल असा प्रकार करण्यात आला आहे.ते सर्व खोटे व बनावट आहे.

मतदानाला केवळ दोनच दिवस असताना, देशाच्या गृहमंत्र्यांसोबत डॉ.पाटील यांचं वीनाकारण नांव जोडून ग्रामीण भागातील मतदारांच्या मनात पाटील यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यात तिळमात्र शंका नाही. हितशत्रूंकडून खोट्या गोष्टी /अफवा/निरर्थक मुद्दे मांडून मतदानावर परिणाम टाकण्यासाठी केलेल्या या प्रयत्नामुळे मतदारांमध्ये असंतोष पसरला आहे.

या बाबत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देखील तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती आहे. येत्या दोन दिवसात अजून असा प्रकार होऊ शकतो. मात्र अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदार दुधखुळे नाही. तर अशा अफवांवर विश्वास ठेवणार नाही आणि घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहून आपलं मतदान डॉ.पाटील यांनाच करणार, अशी मतदारसंघात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!