Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडी४० जणांना वाचविण्यासाठी ३० तासांपासून शर्थीचे प्रयत्न ! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकले कामगार

४० जणांना वाचविण्यासाठी ३० तासांपासून शर्थीचे प्रयत्न ! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकले कामगार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये दिवाळीच्या सकाळी बोगद्यात घडलेल्या दुर्घटनात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा ते डंडालगावादरम्यान निर्माणाधीन सुरुंगात भूस्खलन झाले आहे. यामुळे आतमध्ये खोदाईसाठी गेलेले सुमारे ४० कामगार, अधिकारी अडकले आहेत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ठेकेदार आणि प्रशासनाची मोठी खटपट सुरु झाली आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतू, गेल्या ३० तासांहून अधिक काळ हे लोक आतमध्ये अडकलेले असल्याने त्यांना ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी पाईपचा आधार घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस बचाव कार्य करत आहेत.

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाइपलाइनद्वारे कॉम्प्रेसरद्वारे दाब निर्माण करून रात्री बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हरभऱ्याची पाकिटे पाठवण्यात आली आहेत.

बोगद्यात अडकलेल्या राज्यांमध्ये बिहारमधील 4, उत्तराखंडमधील 2, बंगालमधील 3, यूपीमधील 8, ओरिसातील 5, झारखंडमधील 15, आसाममधील 2 आणि हिमाचल प्रदेशातील एकाचा समावेश आहे. अडकलेल्या लोकांकडून अन्नाची मागणी केली जात आहे. सुमारे साठ मीटर आत ते अडकले आहेत. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!