अकोला दिव्य न्युज ब्युरो : गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी सकाळी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्रारंभी राजराजेश्वर मंदिरात लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार रणधीर सावरकर, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संस्थापक अध्यक्ष डॉ आर.बी.हेडा यांनी महापूजा केल्यानंतर स्वागत यात्रेला सुरूवात करण्यात आली. यात्रेत पारंपरिक वेशभूषा, केशरी फेटे घालून नागरिक सहभागी झाले होते. ही यात्रा काळा मारोती, सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, राणी सती धाम मंदिर येथून मार्गक्रमण करीत, टाॅवर चौक, रतनलाल प्लॉट चौकमार्गे सिव्हिल लाइन, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौक येथून मार्गक्रमण करत बिर्ला राम मंदिर येथे पोहोचली. याठिकाणी महाआरतीने स्वागत यात्रेचा समारोप झाला. रॅलीमध्ये संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ.आर.बी हेडा, कार्याध्यक्ष हरिष आलिमचंदानी, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, महेश जोशी, हेमेंद्र राजगुरू, इंद्राणी देशमुख, सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, चंदा जयस्वाल,आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, निकेश गुप्ता, डॉ. माधव देशमुख, विवेक देवकते, नंदकिशोर आवारे, अभय बिजवे, विनोद देव, मनीष चंदानी, अशोक पाध्ये, आनंद बांगड, समितीचे संयोजक विनोद जकाते, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर,मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायन्दे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार प्रमुख समीर थोडगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
राम दरबार विशेष आकर्षण
लोकसभेची निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर समितीच्यावतीने मतदानाबाबत संदेेश देणारे विविध प्रकारचे फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या यात्रेत मर्यादा पूरुषोत्तम प्रभू श्रीराम,सीता माई,लक्ष्मण,राम भक्त हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षण होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा राणीसती धाम मंदिर मार्गावरून स्वागत यात्रेने न्यू राधाकिसन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे पोहोचून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.