अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिवाळी अंकाच्या पारंपरिक वाटेने न जाता समाजात जे जे काही वंदनीय, अभिनंदनीय आहे ते नेमके हेरून वाचकांसमोर मांडण्याची परंपरा ‘अकोला दिव्य’च्या दिवाळी अंकाने नेहमीच जपली आहे. या क्रमात यंदा जीवनाची वेगळी वाट शोधणाऱ्या गौरवगाथांना स्थान देणाऱ्या ‘अकोला दिव्य’ चे प्रकाशन नारीशक्ती यांच्या हस्ते आज शनिवारी सकाळी थाटात पार पडले.
अकोला दिव्य कार्यालयात आयोजित या छोट्याशा प्रकाशन सोहोळ्याला महिला उद्योजिका पुजा पंजवाणी, बिजल संघवी, डॉ.संगीता गुरुदासाणी, उर्मिला सोमाणी, युवा व्यवसायी कनक पंजवाणी व ‘अकोला दिव्य’ चे एडिटर इन चीफ गजानन सोमाणी, उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना महिला उद्योजिका पुजा पंजवाणी,व म्हणाल्या की, जिद्द आणि गुणवत्तापूर्ण व्यवहार आवश्यक आहे.आज व्यवसायात महिला यशस्वी होत असून, महिलांना आरक्षणापेक्षा सुरक्षा आणि प्रोत्साहन अधिक आवश्यक आहे.
‘अकोला दिव्य” दिवाळी अंकाचे प्रकाशन नारीशक्तीच्या हस्ते करण्यामागे एकच कारण की, महिलांचा या क्षेत्रात सहभाग वाढविणे गरजेचे आहे. डिजिटल माध्यमातून महिला या क्षेत्रात आपली कारकीर्द सहजपणे घडवून, या माध्यमातून महिलांना पाठबळ देण्यासाठी अधिक सक्षम होईल, असे विचार एडिटर इन चीफ गजानन सोमाणी यांनी मांडले.
दरवर्षी एका विषयाला धरून, महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांच्या साहित्यातून अकोला दिव्यचा दिवाळी अंक प्रकाशित केल्या जाते. यंदा विशेषत वर्षा टोळ यांचं’बालपण वाचवण्यासाठी, मधुरा कुलकर्णीचं लाखो लोकांसाठी आशेचा किरण, प्रा.मुक्ता पुरंदरेंचा महिला आरक्षण समस्या सोडवेल ?, राधिका परांजपे यांचे बेरोजगारीचे आव्हान गडद आणि भागा वरखडे , अनिता दाते, रोहिणी हट्टंगडी या नामवंत महिला विचारवंतांच्या सशक्त लेखणीतून उतरलेले साहित्य या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
दर्जेदार दिवाळी अंकाचे स्वागत मूल्य केवळ 50 रूपये असून दिवाळी अंकासाठी 98530 88255 या क्रमांकावर नांव नोंदणी करून घर पोहच अंक मिळवून घ्या