अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवर वर्षभर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवून अनेक व विविध स्पर्धांमध्ये सन्मित्र स्कूलच्या जवळपास १७६ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विजय मिळवीत आपला दबदबा कायम राखला आहे.
शहरातील रामदासपेठ स्थित आणि ‘सर्वांगीण विकास हा एकच ध्यास’ हे बिरूद असलेल्या सन्मित्र स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र् राज्य क्रीडा संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये करिक्यूलर आणि को-करिक्युलर या मध्ये विद्यार्थी नेत्र दीपक कामगिरी करीत आहेत. या विजयासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन वारंवार भेटत राहीले. अर्थात विद्यालयाच्या प्राचार्या मनिषा राजपूत व संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांचे. त्यामध्ये शालेय गटामधून अर्पिता करवते हीने कॅरम या खेळात राज्यस्तरावर आपले नाव नोंदवले आहे. अर्पिता करवते व उज्वल करवते या दोन भावंडांनी संघटनेच्या माध्यमातून कॅरम या खेळात राष्ट्रीय पातळीवर आपला सहभाग नोंदवला आहे.त्याचप्रमाणे शालेय गटातून विभागीय स्तरावर सहभागी झालेले दर्शन गावंडे व अमित काळणे- योगासन व जिमनॅस्टिक, सर्वज्ञ लोड – योगासन, आदित्य पांढरकर- कॅरम ,हर्षद भोकरे – वेटलिफ्टिंग,ईशांत राऊत – ताईक्वांदो तर तलवारबाजी मधून समर्थ धरमठोक,धनश्री देशमुख आणि प्रथमेश नेमाडे चमकले आहेत.
शासनाच्या संलग्नित विविध संघटनांनी आयोजित केलेल्या खेळातूनही राज्यस्तरावर सहभागी झालेले विद्यार्थी म्हणजे टेनीक्वाईट मधून मंथन केशवार व प्रथम आमले तर सॉफ्टटेनिस मध्ये प्रथमेश नेमाडे,रोहित अहिर व आश्रय ढोक यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शालेय गटातून सांघिक खेळांमध्ये सुद्धा जिल्हा व विभागीय स्तरावर सुद्धा सन्मित्र स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून विजयश्री खेचून आणली आहे.विभागीय स्तरावर टेनीक्वॉईट सतरा वयोगट मुले , एकोनविस वयोगट मुली विजयी झाले व चौदा वयोगट मुले उपविजेते ठरले आहेत.टेनिस बॉल मध्ये सतरा वयोगट मुलं विजयी झाले आहेत.
जिल्हा स्तरावर हॉकी मध्ये १९ वयोगट मुलं, कबड्डी मध्ये १७ वयोगट मुले, बॉल बॅडमिंटन मध्ये १९ वयोगट मुले, डॉजबॉल मध्ये १७ वयोगट मुले व मुली, सॉफ्टबॉलमध्ये १९ वयोगट मुले व मुली, बेसबॉल १७ वयोगट मुले व मुली, टेनिस क्रिकेट मुले आणि टेनीस व्हॉलिबॉल मध्ये १४ वयोगट मुले यांनी विजय मिळवला आहे. शाळेचे शारीरिक शिक्षक गाढे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द व सराव या त्रिसूत्रांनी विद्यार्थी वर्षभर यशाची फळे चाखत राहिले. नुकतेच २८ ते ३१ मार्च दरम्यान वाराणसी येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप २०२३-२४ मध्ये अर्पिता करवते व उज्वल करवते या दोन्ही भावंडांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले. शाळेच्या प्राचार्या मनिषा राजपूत आणि संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी दोन्ही भावंडांचे व इतर विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.