अकोला दिव्य न्युज ब्युरो : शासकीय कार्यालयातील काम आणि शासकीय अधिकारी अधिकारी म्हटले की, सामान्य व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहतो. पण सौजन्यानी वागणूक, नियोजनबध्द प्रयत्न व उद्दिष्टपुर्तीसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली तर कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांकडून मानमरातब मिळण्यासोबत महसूल संकलनाचे उद्दिष्ट सहज शक्य होते.हे क्रमांक ३ चे सह दुय्यम निबंधक निलेश वि. शेंडे यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
शासनाने अकोला येथील सह दुय्यम निबंधक अकोला क्रमांक 3 यां कार्यालयास सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरीता 50 कोटी इतके महसुलाचे उद्दीष्ट दिले होते. सदरच्या इष्टांकपुर्तीकरीता या कार्यालयाने मागील वर्षभरात 5 हजार 468 इतक्या दस्तांची नोंदणी केली. त्यामध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, ऑनलाईन व ऑफलाइन करारनामे तसेच गहाणखत ईत्यादी दस्तऐवजांची नोंदणी करून 53 कोटी 38 लाख इतक्या म्हणजेच तब्बल 106.77 टक्के इतक्या महसुलाची शासन तिजोरीत भर टाकली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मुद्रांक शुल्काची ही वसुली दुप्पट आहे. मागील वर्षामध्ये या कार्यालयास 27 कोटी इतके महसुली उद्दीष्ट दिले होते. त्यावेळी या कार्यालयाने 24 कोटी 70 लाख (91.49 टक्के इतका महसुल जमा केला होता.
सन 2023-24 साठी 50 कोटी इतके रूपयाचे महसुल संकलनाचे उद्दीष्ट असताना उद्दीष्टाच्या 106.77 टक्के महसूल संकलीत करुन नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहे. यामाध्यमातून 53 कोटी 38 लाख रुपये इतका महसुल संकलीत झाला आहे.विशेष म्हणजे सन 2023-24 मध्ये वार्षिक बाजारमुल्य दरामध्ये शासनाने कोणतीही दरवाढ केली नाही. तरीसुध्दा महसुल वसुलीचे उद्दीष्ट या कार्यालयाने पुर्ण केले. दस्तावेज नोंदणी करिता येणाऱ्या लोकांना सौजन्याची वागणूक, त्रुटींमुळे काम रखडले तर सहजपणे ती त्रुटी कायद्याने दूर करुन देणे, वेळेवरच दस्तावेज नोंदणी आणि कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी नियोजन केल्याने, हे सहजपणे शक्य झाले. महसूल संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे तर समाधान आहेच. पण लोकांच्या मनात काम आणि कार्यालयाबद्दलची आपुलकीने वेगळे आनंद होतो. असं सह दुय्यम निबंधक निलेश वि. शेंडे यांनी सांगितले.