गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : कर्त्या पुरुषाला संसार करताना बरीच संकटे येतात, अशात मुळीच न डगमगता, जीव आणि ब्रह्म एकच असून दैव, देवाचा धावा करत जीवन कसे जगावे हे आपल्या कृतीतून शिकविणारे योगीराज श्री गजानन महाराजांवर अस्सीम श्रध्दा असणारे भक्त केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारतासह विदेशात आहेत. नवसाला पावणारे नव्हे पण सद्गुरू गजानन महाराज भक्तांच्या हाकेला धावून येतात, हा अनुभव लाखो भक्तांनी स्वतः अनुभवले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी शेगांववासी आणि मारवाडी समाजबांधवांनी जे बघितलं आणि अनुभवलं, ती खरोखरच ‘श्रीं’ चीच इच्छा !
संत गजानन महाराजांना आपलं सर्वस्व मानून, वारकऱ्यांना आपलं कुटुंब आणि शेगांवला मोक्षाचीभुमी मानना-या ‘भक्ताची’ अंतिम इच्छेप्रमाणे चक्क, एका व्याहीची (समधी) अंत्ययात्रा दुसऱ्या व्याहीचा घरातून निघणे, कदाचित हा एक अलौकिक,अविस्मरणीय असा पहिलाच प्रसंग, अनेकांनी याच देही याची डोळी बघितलं.
ओडिशा राज्यातील झारसुगुडा येथील रहिवासी अँड.सुशीलकुमार मुंधडा यांचा मुलगा चैतन्य याच लग्न शेगाव येथील राजेश मूना यांच्या भाची सोबत झाले. त्यानंतर विविध प्रसंगी मुंधडा यांचं शेगांव येथे येणे होऊन, त्यांची गजानन महाराजांवर निस्सीम श्रद्धा जडली. कालांतराने हरिपाठात रममाण होत, त्यांच्या ठायी वारकरीच त्यांच कुटुंब आणि शेगाव हेच शेवटचेस्थान झाले. जेव्हा अनंताची यात्रा सुरु होईल. तेव्हा महाराजांच्या मंदिरातील विभूती (अंगारा/उदी) आपल्या शवासोबत ठेवून, शेगावच्या मोक्षधाममध्ये आपले अंतिम संस्कार करण्यात यावे, अशी अंतिम इच्छा अँड.सुशीलकुमार यांनी आपल्या कुटुंबाला सांगून ठेवली होती. शेंगाव वास्तव्यात २ मार्चला त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या इच्छेप्रमाणे चैतन्य मुंदडा, मुलगी सौ.अदिती भागडिया आणि लहान मुलगा श्रीकृष्ण मुंधडा या तिघांनी अंतिम संस्कार शेगावला करण्याचे नियोजन केले. आपल्या व्याहीच्या इच्छेचा सन्मान करीत राजेश मूना, त्यांच्या पत्नी हेमा आणि मूना परिवाराने आपल्या घरातून, आपल्या भाचीचे सासरे अर्थात स्व. सुशीलकुमार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कार कार्यात साथ दिली. नात्यांमध्ये व्याही असलेले राजेश मूना यांनी मुंधडा कुटुंबातील दु:ख स्वतःचे दु:ख मानले. या दुःखाचं शोक पाळला. स्वत:च्या घरातूनच सुशील मुंधडा यांना अखेरचा निरोप दिला.
आजपर्यंत लग्न आणि शुभकार्ये इतरांच्या घरी / दारात होतांना बघितले, ऐकले होते. आज पहिल्यांदाच एका व्याहीला अखेरचा निरोप व्याहीने दिला. संपूर्ण मानवसमाज व राजस्थानी समाजाला एक भक्कम संदेश आहे. स्वार्थ परत्वे नाते जोडणे वा नातेवाईकांचे कार्य करणाऱ्या आजच्या मतलबी जगात, अशा घटना बघितले तर मनाला कोठे तरी आधार मिळतो. एकमात्र खरं आहे की, अशा लोकांमुळेच ” मनवी संवेदना” जीवंत आहे. बोला,गण गणात बोते !