सीबीआयने २०१७ सालच्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा दिला आहे. नागरी उड्डाण मंत्री असताना एअर इंडियाला विमान देण्याच्या निर्णयात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात आता आता प्रफुल पटेल यांना दिलासा मिळाला असून सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करून हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बावनकुळेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं – काँग्रेसचा आरोप
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ही बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माननीय सर्वोच्च न्यायालयात या बाबतीत निकाल दिला अशी खोटी माहिती सांगून सर्वोच्च न्यायालयाची आणि आचारसंहीता या दोन्ही नियमांचे उल्लंघन केलं आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत
भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला अभिनेता गोविंदा आज शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे. काही वेळापूर्वीच गोविंदाने हाती भगवा झेंडा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाचे प्रवेश झाले आहेत. त्याची सुरुवात गोविंदाच्या पक्ष प्रवेशाने झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. राम नाईक यांचा पराभव करणारा गोविंदा आता शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे.