अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत समावेश आणि जागा वाटपाबाबत निर्माण झालेला तिढा कायम असल्याने, आज गुरुवार २१ मार्चला मुंबईत सकाळी १२ वाजता झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे. असे वृत्त आहे.
महाविकास आघाडीतर्फे आज पवार यांच्या उपस्थितीत आज गुरुवार २१ मार्चला शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.परंतु मविआच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देण्यास तयारी दर्शवली. परंतु अँड आंबेडकर यांनी यावर कुठलाही प्रतिसाद दिला नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. अँड आंबेडकर यांचा मविआत सहभाग करुन घेण्यासाठी कॉंग्रेसकडून भरपूर प्रयत्न केले जात आहेत.आपल्या हिस्स्यातील जगातून जागा देण्यास कॉंग्रेसकडून तयारी दर्शवली आहे. यासोबतच सांगली, भिवंडी या दोन जागांवर शिवसेनासोबतही पेंच फसला आहे.
दिल्लीत काल झालेल्या कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत कॉंग्रेसने 18 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर. लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असल्याने या मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहे. पण अधिकृतपणे ती जाहीर करण्यात आली नाही. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मतदार संघाच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून संभाव्य उमेदवार म्हणून काही नावं निश्चित करण्यात आले. परंतु अधिकृत घोषणा केली नाही. पण काही नावेही बाहेर आली असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. पण अधिकृतपणे घोषणा होईपर्यंत काहीं शक्य होऊ शकते..