Friday, November 22, 2024
HomeUncategorizedमोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप, ‘या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप, ‘या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.

राम नारायण गुप्ता उर्फ लखन भय्या हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भय्याला वाशी या ठिकाणाहून उचलण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर अनिल भेडा हा व्यक्ती होता. याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा या ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये लखन भय्याचं एन्काऊंटर करण्यात आलं. २००६ मध्ये ही घटना घडली होती. आता या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

२००६ मध्ये झालेल्या लखन भय्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलीस दलांतील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र राजकारणात त्यांना अपयश आलं. आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातला निकाल राखून ठेवण्यात आला होताया प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल देण्यात आला. या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!