Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याचिठ्ठी आयी है.....पंकज उधास यांचं निधन ! ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा...

चिठ्ठी आयी है…..पंकज उधास यांचं निधन ! ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पंकज उधास ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है.. सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.

पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पंकज यांच्या कन्या नायाब उधास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत आणि हे तुम्हाला सांगत आहोत की पद्मश्री पंकज उधास यांचं निधन झालं. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते, जे हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉपमधील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले. १९८० मध्ये ‘आहत’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर  १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली.२००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा  भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!