अकोला दिव्य न्युज ब्युरो : विदर्भातील सहकार क्षेत्रात अग्रणी अकोला येथील भारतीय सिंधू सहकारी पत संस्था मर्यादित अकोला या संस्थेच्या वर्ष 2024-29 या पाच वर्षासाठी संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणूकीत सिंधू सहकार पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी झाले, राखीव मतदार संघात 5 ही उमेदवार अविरोध विजयी झाले, ज्यामध्ये लिलाराम पंजवानी, सुनिल पवार, संतोष पाचपोर, चंद्रा हरीश मनवानी व सत्या हिरालाल कृपलानी तसेच सर्व साधारण मतदार संघात सिंधू सहकार पॅनलचे सर्व 6 उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी झाले, सिंधू सहकार पॅनल चे सुत्रधार तसेच संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि सतत 32 वर्षापासून संचालक असलेले विनोद मनवानी सर्वाधिक मतांनी विजयी झाले. विद्यमान अध्यक्ष अशोक दर्यानी, अशोक अरोरा, तोलाराम मेंघानी, मनीष लुल्ला व रवि पंजाबी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा १० पटीने अधिक मत मिळवून निवडून आले. वर्तमान पॅनलच्या उमेदवारांवर संपूर्ण विश्वास ठेवून प्रतिस्पर्धी नाकारले आहे. सदर निवडणूकीत सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना 3100 पेक्षा जास्त मते मिळाली तरअसुन प्रतिस्पर्धी उमेदवारांना फक्त 300 ते 386 मतांवर समाधान मानावे लागले.
सिंधू सहकार पॅनलने संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले. भविष्यात अशा प्रकारे सहकार्य व विश्वास कायम ठेवून संस्था प्रगती पथावर अजून तीव्र गतीने वाटचाल करील, असं आश्वासन नवनिर्वाचित संचालक मंडळाने दिलं आहे. संस्थेचे हित रक्षण आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवण्याकरिता नव निर्वाचित संचालक मंडळ कटिबध्द आहे, असे मनोगत सहकार पॅनलनी व्यक्त केले आहे.