अकोला दिव्य न्युज ब्युरो : मासिक पाळी ही स्त्री मुलींच्या जीवनातील शारीरिक घडनातील नैसर्गिक प्रक्रिया असून असून ते सहजतेने स्वीकारावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना सहजपणे सामोरे जावे असे मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थच्या अध्यक्षा व ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा चिरानिया यांनी केले. श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा मंडळ द्वारा संचालित मा सारदा ज्ञानपीठ येथे वर्ग सहावी ते दहावीच्या मुलींना मासिक धर्म आरोग्य आणि दक्षता या विषयावर आयोजित चर्चा सत्रा मध्ये त्या बोलत होत्या.
चर्चासत्रात डॉ.शिल्पा चिरानिया, डॉ. किरण गुप्ता, डॉ. रेखा शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होत्य. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सत्यनारायण बाहेती, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत खत्री, रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थच्या सचिव डॉ मेघना गांधी, डॉ श्रद्धा अग्रवाल मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून पुष्प रोपटे व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. बाहेती यांनी रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थच्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.
चर्चासत्रात डॉ. शिल्पा चिराणीया यांनी विद्यार्थिनींना ‘मासिक स्वास्थ आणि मासिक धर्म स्वच्छता’ या विषयावर विविध प्रकारची उदाहरणे देऊन त्यांच्यामध्ये असणारे गैरसमज दूर केले. तसेच या गोष्टी विद्यार्थिनींनी आपल्या आई, शिक्षका यांच्यासोबत मनमोकळेपणांनी बोलावे तरच आपल्या समस्या दूर होतील असे सांगितले. तसेच मासिक स्वास्थ कसे चांगले राहील हेही समजावून सांगितले त्यासाठी कोणकोणत्या अन्न पदार्थाचा अन्नामध्ये समावेश करावा आणि कोणते अन्नपदार्थ खाऊ नये याचेही मार्गदर्शन केले .
डॉ.रेखा शुक्ला यांनी आपल्या भाषणात कोणत्या प्रकारची योगासने केल्याने आपले मासिक स्वास्थ चांगले राहते हे पटवून दिले .व योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच डॉ. किरण गुप्ता यांनी सूर्यनमस्कार आपल्या जीवनात किती आवश्यक असतात आणि ते केल्याने आपल्या स्वास्थ्यावर त्याचा चांगला परिणाम कसा होतो. याविषयी मार्गदर्शन केले .विद्यार्थिनीनी सुद्धा आपल्य समस्यांचे निवारण केले.
चर्चासत्रात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी या चर्चासत्राच्या आयोजना बद्दल आनंद व्यक्त केला. महिला पालक आणि शाळेतील शिक्षिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन किरण तायडे तर आभार प्रदर्शन कल्पना पोहरे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सावित्री विश्वकर्मा, पुनम गावंडे, मंजुषा शर्मा, स्नेहा खंडारे, योगिता सरनाईक, सुषमा दाभाडे, प्रतिभा दुधे, निकिता दुधे, शिवानी बैस, सीमा पारतवार, प्रीती शिंदे, स्वाती गावंडे, करुणा बागडे, अश्विनी सरोदे, नीता तायडे, रेणुका दुधे, साधना गोपनारायण, ज्योती इंगळे आदींनी परिश्रम घेतले.