अकोला दिव्य न्युज ब्युरो : थैलेसिमीया आजारग्रस्त रुग्णांसाठी अकोला थैलेसिमीया सोसायटी आणि उगवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान करुन या मानवीय कार्यांत आपला सहभाग नोंदविला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही उज्वल विठ्ठल बांड या थैलेसिमीयाग्रस्त रुग्णांच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अनौपचारिक उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अरविंद साकरकर होते.शिबिरात प्रमुख पाहूणे म्हणून अकोला थैलेसिमीया सोसायटीचे अध्यक्ष हरीषभाई अलिमचंदानी उपस्थित होते. थैलेसिमीया सोसायटीचे सदस्य संजय डेंबळा दिपक भानुशाली, राहुल शर्मा यांची उपस्थीती लाभली होती.
यावेळी अयोध्या येथे कारसेवक म्हणून गेलेले उगवा येथील कारसेवक रामेश्वर बानवाकोडे, सुनिल काळणे, सचिन बहाकर, प्रशांत साकरकर,जकाते यांचा सत्कार करण्यात आला.तसेच १०५ वेळा रक्तदान करणारे उगवा येथील रहिवासी डॉ. प्रमोद ज्ञानदेवराव वानखडे यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबीरात उगवा रहिवासी तसेच शेगांव आगार व राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा आणि अकोला विभागातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. उगवा येथे रक्तदान शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.रक्ताचे संकलन साई जीवन रक्त पेढीला तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी केले. शिबीरात डॉ.मंगेश कोरडे, विजयराव देशमुख,सरपंच गजानन बहाकर, शामभाऊ साकरकर, सिध्दार्थ शिरसाठ,के.जी.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.