अकोला दिव्य न्युज ब्युरो : रामदासपेठ स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये मध्ये राष्ट्रीय गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्य क्रमाचे अध्यक्ष गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिह राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांना इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्चपास द्वारे मानवंदना दिली आणि त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भारतीय घटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.शाळेच्या प्रांगणाच्या सजावटीने सर्वांचे मन आकर्षित केले होते.पूजा सोनोने व कृतिका गावंडे, श्रावणी या विद्यार्थ्यांनी सुंदर व मनमोहक रांगोळी काढली होती. साधना बोबडे व तृप्ती आघडते, सायली मुरूमकर यांनी सुंदर फलक सजावट केली होती. ध्वजारोहनानंतर नारे व आदिती गावंडे, श्रेयस भटकर, कन्वी पटेल, भक्ती सुतार यांनी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर,”सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा “हे गीत सादर केले.दिया राऊत, ईशान राऊत, फाल्गुनी मेढे, प्रणव ढेगळे, गौरव सोळंके, आराध्या मोरे, अमित मिश्रा या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गणतंत्र दिवसाचे महत्व सांगितले. इशिका कडोले, ऋतुजा बोरकर, समीक्षा इंगळे, त्रिवेणी तायडे, कृष्णाली लोखंडे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले.
यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी व मुलींनी गाढे सरांच्या मार्गदर्शनात सादर केलेले मानवी मनोरे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.मुली कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर आहेत हे सिध्द केले. रिषा भारती,सेजल तिरपुडे,मंजिरी मोरे आणि गौरी चौबे या मुलींच्या संचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेत विविध स्पर्धा, जयंती, पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अव्वल क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थांना प्रेरणा मिळावी म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीपसिंह राजपूत व मनिषा राजपूत यांनी अनेक विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व पदके देऊन सन्मान केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदानी परिश्रम केले तर सांगता रिया भारती या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शनाने केली.