अकोला दिव्य : प्रभात किड्स स्कूलच्या 3 खेळाडूंनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विविध शाळेच्या खेळाडूंनी देखील सहभागी होऊन या खेळामध्ये रंगत आणली. प्रभातच्या 3 कॅरमपटूंनी विरुद्ध स्पर्धकांना मात देत उत्कृष्ट यश संपादीत केल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.विदर्भ कॅरम असोसिएशन व एलआरटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन एलआरटी कॉलेज, अकोला येथे दि.20 व 21 जानेवारी रोजी करण्यात आले होते.
तसेच कॅरम हा खेळ भारतात खूप खेळला जातो. ह्या खेळासाठी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन ही संस्था भारतात कार्यरत आहे.अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या गटात अर्णव पटेल ह्याने द्वितीय तर आयुष डोबाळे ह्याने पाचवा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले. तसेच 18 वर्षाआतील मुलांमध्ये आयुष टेकाम ह्याने पाचवा क्रमांक मिळविला. या तिनही विद्यार्थ्यांना प्रभातचे कॅरम प्रशिक्षक तन्वीर खान यांचे मार्गदर्शन लाभले.प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे