अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर खुले झाले आहे.दरम्यान प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे ३५० हून अधिक विशेष चालवणार असून ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने या गाड्या धावणार आहेत. अकोला रेल्वे स्थानकावरुन ही गाडी येत्या १९ फेब्रुवारीला अयोध्यासाठी रवाना होणार आहे.
देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल रेलवे चालवल्या जाणार आहेत. यात अकोलामार्गे सिकंदराबाद-अयोध्या धाम विशेष रेल्वे १८ फेब्रुवारीला धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७२९७ सिकंदराबाद-अयोध्या धाम विशेष रेल्वे रविवार, फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथून दुपारी १५:०० वाजता रवाना होऊन अयोध्या धाम येथे मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी पहाटे ०३:३५ वाजता पोहोचेल.
ही गाडी अकोला स्थानकावर सोमवार, १९ फेब्रुवारीला ०२:१५ वाजता (रविवारची रात्र)येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७२९७ अयोध्या धाम-सिकंदराबाद विशेष रेल्वे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी अयोध्या धाम येथून दुपारी १४:२० वाजता रवाना होऊन शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९:१५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. ही गाडी गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १६:३५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.