अकोला दिव्य न्युज ब्युरो : तब्बल ३२ वर्षा पुर्वी राममंदिराकरीता अयोध्या येथे भारतभरातून आलेल्या कारसेवकांसोबत अकोला येथुन त्यावेळी दाखल झालेल्या कारसेवकांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. असा प्रकारे सत्कार होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याचे कारसेवकांनी सांगून माजी नगरसेवक व अकोला थॅलैसिमीया सोसायटीचे अध्यक्ष हरिषभाई आलीमचंदानी आणि आलीमचंदानी कुटुंबांसाठी सुयश चिंतन केले.
श्री हरीषभाई मित्र मंडळ व आळशी प्लॉट मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बहुसंख्य कारसेवकांची उपस्थिती लाभली होती. त्यात प्रामुख्याने सिध्दार्थ शर्मा, पवन पाडिया, चंद्रकांत पांडे, राजू अग्रवाल, दादा पंत, शकुन परांजपे तसेच अनेक महीला कारसेवक देखील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आ.डॉ. रणजीत पाटील, रवी भुसारी, मधुर खंडेलवाल, रेखा खंडेलवाल, सिधीं पंचायत प्रमुख रंगवानी, विनोद मोटवानी, कमल आलिमचंदाणी, मयुर सुर्यवंशी, अरुण आलीमचंदानी, नितेश पाली, मुकुंद व्यास, मनोज खंडेलवाल सोबत बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. दिप प्रज्वलन,श्रीराम मुर्ती पुजन आणि स्व.गोवर्धन शर्मा व स्व. लक्षमनदास आलीमचंदानी यांच्या स्मृतीस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली झाली.
यावेळी सिद्धार्थ शर्मा, श्रीकांत कोंडोलीकर, राजू अग्रवाल यांनी कारसेवेतील आठवणी सांगितल्या.समारोपीय संबोधन रवीजी भुसारी यांनी केले. संचालन नुतन जैन तर आभारप्रदर्शन ॲड. सौरभ शर्मा यांनी केले.