अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : माहेश्वरी समाजातील युवकांचा सर्वांगीण विकास आणि उपजात कला गुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अखिल भारतवर्षीय माहेश्वरी युवा संघटनेच्या पंधराव्या सत्रासाठी नुकत्याच झालेल्या अविरोध निवडणुकीत अकोला येथील युवा कार्यकर्ते सागर अशोक लोहिया यांची संघटनेच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. वृंदावन येथे झालेल्या सभेत मुख्य निवडणूक अधिकारी अमित सारडा यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात प्रत्येक पदासाठी निर्धारित वेळेत एकच नाव आल्याने अमित सारडा यांनी पार पडलेल्या निवडणुकीत नवीन कार्यकारिणीतील विविध पदांवर अविरोध निवडून आलेल्यांची नावे जाहीर केली.

यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी जयपूर येथील अनुज सोनी, महामंत्रीपदी मुंबई येथील पुष्पक लढ्ढा, कोषाध्यक्ष म्हणून अकोला येथील सागर लोहिया, संघटन मंत्रीपदी सुनील सोनी (हैदराबाद), सांस्कृतिक मंत्री वैभव भूतडा (हुबळी) आणि क्रीडा मंत्रीपदी भीलवाडा येथील शशांक बिर्ला यांची निवड झाली. तसेच उत्तरांचल उपाध्यक्ष संयोग माहेश्वरी (कालांवाली) पश्चिमांचल- अविनाश अजमेरा (कोटा), दक्षिणांचल- सौरभ इनाणी (इचलकरंजी), पूर्वांचल- भास्कर सोनी (विराटनगर)मध्यांचल राजेश गांधी (अभनपूर) तसेच उत्तरांचल सहमंत्री मुकुंद केला (अलीगढ), पश्चिमांचल राघव कोठारी (भीलवाडा), दक्षिणांचल अमित पोरवाल (पाँडिचेरी) पूर्वांचल- रोहित काबरा (राउरकेला) मध्यांचल- अंकित टावरी (बुलढाणा) यांची निवड झाली.
अखिल भारतवर्षीय माहेश्वरी युवा संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतवर्षीय माहेश्वरी युवा संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडू असे सागर लोहिया यांनी सांगितले.विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संघटनेचे वर्तमान अध्यक्ष सागर लोहिया समाजात सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल, पुणे द्वारे संचालित स्वावलंबन योजनेचे विदर्भ प्रदेश समन्वयक असून माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष,अकोला तहसील माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष आणि अकोला जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे सचिव म्हणून काम केले आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनतीन सत्रांपासून व राष्ट्रीय कार्यकारी मंडळात दोन सत्रांपासून सक्रिय सहभाग घेतला आहे.
५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून, Golden Blood Donor म्हणून राष्ट्रीय कार्य करणारे लोहिया यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजाच्या योजनांचा लाभ पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहयोग व मार्गदर्शन. राष्ट्रनिर्माणात सहभाग सुनिश्चित करण्यासाठी भारतभरात समाजातील तरुणांची एक सशक्त साखळी तयार करण्यात योगदान आणिसमाजातील शेवटच्या घटकाला समाजाशी जोडणे आणि त्या कुटुंबाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे आपले उद्दिष्ट आहे.असे सागर लोहिया यांनी सांगितले.