अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६५ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजिण्यात आली असून, प्रमिलाताई ओक नाट्यगृहात रोज सायंकाळी ७ वा. याप्रमाणे एकूण २० नाट्यप्रयोग होतील.या नाट्यमहोत्सवाची सुरुवात शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी श्याम पेठकर लिखित आणि मिलिंद इंगळे दिग्दर्शित माऊली बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या ‘टिंगल टिंगल’ या नाटकाने होणार आहे.

त्यानंतर रविवार, दि. २२ नोव्हेंबरला दिलीप जगताप लिखित आणि शुभम पाईकराव दिग्दर्शित स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, कोकलगाव यांचे ‘हे दोघे बंधू’ सादर होईल. दि. २३ नोव्हेंबर रोजी श्रीनिवास नार्वेकर लिखित आणि स्नेहल कहाळे दिग्दर्शित श्रीमती मीनाबाई श्रीकृष्ण कहाळे चॅरिटेबल सोसायटी, अकोट यांचे ‘येस माय डियर’, तर मंगळवार, दि. २४ नोव्हेंबरला अमोल कुलकर्णी लिखित व अतुल मेहकरकर दिग्दर्शित श्री साईगणेश शिक्षण व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाचे ‘आरशातल्या आरशात वारले बेवारशी’ हे नाटक रंगणार आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी पूजा भाकरे लिखित आणि वर्षा कवडे दिग्दर्शित जनसखा शिक्षण युवक कल्याण समाज कल्याण व्यायाम क्रीडा संस्था, अकोला यांचे ‘ध्रुण हत्या एक अभिशाप’ सादर केले जाईल.
गुरुवार, दि. २६ नोव्हेंबरला विश्वनाथ लिखित प्रा. अरविंद आणि विष्णू निंबाळकर दिग्दर्शित राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय, कौलखेड, अकोला यांचे ‘एक कहानी गमतीची’, तर शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबरला भगवान हिरे लिखित आणि विनय बोदडे दिग्दर्शित रेनबो लाईव्ह, मोठी उमरी, अकोला यांचे ‘छीन्नमस्ता’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी संकेत तांडेल लिखित आणि वृंदा तायडे दिग्दर्शित निर्माण फौंडेशन, अकोला यांचे ‘घोसाळकर दार बंदच ठेवा’, रविवार, दि. २९ नोव्हेंबरला इरफान मुजावर लिखित आणि सचिन पाटील दिग्दर्शित नटेश्वर नाट्य कला थिएटर फाऊंडेशन, अकोला यांचे ‘अल्पविराम’, आणि सोमवार, दि. ३० नोव्हेंबरला अमोल कुलकर्णी लिखित व विनयकुमार शुक्ल दिग्दर्शित नटेश्वर कलामंच बहुउद्देशीय संस्था, चिखली यांचे ‘यातायात’ हे प्रयोग सादर होतील.
डिसेंबर महिन्यातही नाट्यरसिकांसाठी एकाहून एक सरस प्रयोगांची मेजवानी कायम राहणार असून, मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी सलीम शेख लिखित आणि प्रमोद वानखेडे दिग्दर्शित शेतकरी कला, क्रीडा, आरोग्य शिक्षण, सामाजिक बहु संस्थेचे ‘थलाई कुथल’ हे नाटक सादर होईल. बुधवार, दि. २ डिसेंबरला सलिम शेख लिखित व विक्रम तिवारी दिग्दर्शित उर्जा फौंडेशन, अकोला यांचे ‘कौमार्य’, तर गुरुवार, दि. ३ डिसेंबरला अक्षय संत लिखित आणि श्रद्धा वरणकार दिग्दर्शित मनश्री आर्ट मल्टिपर्पज फाऊंडेशन, अकोला यांचे ‘मलिका’ हे नाटक रंगेल. यानंतर रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी योगेश सोमण लिखित आणि विष्णू क्षिरसागर दिग्दर्शित कृष्णप्राप्ती बहुउद्देशीय संस्था, अकोला यांचे ‘केस नं. ९९’ सादर होणार आहे. सोमवार, दि. १४ डिसेंबरला विजय सोनोने लिखित व दिग्दर्शित माणुसकी मल्टीपरपज संस्था, बुलढाणा यांचे ‘तास वाजे झणाणा’, तर मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी प्रमोद खाडिलकर लिखित व भावना भोपळे दिग्दर्शित हिरकणी फाऊंडेशनचे ‘स्त्री अंत्यकथा’ हे नाटक सादर होईल.
बुधवार, दि. १६ डिसेंबरला रवींद्र भगवते लिखित व उमेश गवळीकर दिग्दर्शित अष्टविनायक सोशल अॅण्ड कल्चर ग्रुपचे ‘ही परी अस्मानीची’, आणि गुरुवार, दि.१७ डिसेंबरला गजानन छबिले लिखित व दिग्दर्शित अंकुर साहित्य संघ, अकोला यांचे ‘अर्धशक्ती’ सादर केले जाईल. स्पर्धेच्या अंतिम टप्यात शुक्रवार, दि. १८ डिसेंबर रोजी हेमंत मानकर लिखित आणि संजय पुरकर दिग्दर्शित अक्षरदेह नाट्यकला व बहु. संस्थेचे ‘चिंधी बाजार’, तर शनिवार, दि. १९ डिसेंबरला राजीव जोशी लिखित आणि आरोही उनवणे दिग्दर्शित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अकोला यांचे ‘गाणे सहजीवनाचे’ या नाटकाने स्पधेर्चा समारोप होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी अकोल्यातील सर्व नाट्यप्रेमींना या दर्जेदार नाट्यमहोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.