‘दीपावली पहाट’ने रसिकांची मने जिंकली ! कमल फाउंडेशनचा पुढाकार

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दिवाळीचा उत्साह आणि आनंद द्वगुणित करण्यासाठी आयोजित ‘दीपावली पहाट’ने रसिक व दर्शकांना मंत्रमुग्ध केले. कमल फाऊंडेशन व जागृत वीर हनुमान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    दीपावली पहाट कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. सेवा समितीचे अध्यक्ष सतीश दाभाडे, यांनी प्रास्ताविकातून दीपावली पहाट घेण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उमंग सांस्कृतिक मंचचे मुख्य संयोजक पवन फुलमाळी व त्यांच्या शिष्यांनी सुरेल आवाजाने केलेल्या गीत गायनाने रसिक व प्रेक्षकांची मने जिंकली.यानंतर नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव हरीश खेडकर यांनी तीन अंध, अपंग मुलांच्या कर्तुत्वाचा परिचय करून दिला. तीन्ही अंध आणि अपंग मुलांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीने सर्व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

    भारत बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम करणारी कुमारी पूर्वी महाडिक या ७ वर्षाच्या मुली सोबत तिच्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पूर्वी हिने मनोगत व्यक्त करून सेवा समिती तसेच कमल फाउंडेशनचे ऋण व्यक्त केले. यावेळी तीन नृत्य सादर केले. विधान परिषदेचे सदस्य संजय भेंडे यांनी रसिकांना मार्गदर्शन करून येत्या काही काळात आमदार निधीमधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाचा जीर्णोद्धार करण्याचे वचन दिले.

    कार्यक्रमाला नगरसेवक रमेश भंडारी, नगरसेविका विशाखा मोहड, माजी नगरसेवक रमेशभाऊ शिंगारे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष गौतम गाणार, महारेगाचे उपसंचालक प्रशांत ढाबरे, नागपूर येथील सुप्रसिद्ध निवेदक तथा साहित्यिक, कवी महेश तिवारी, सुप्रसिद्ध गायक पी.कुमार, सुप्रसिद्ध कलावंत प्रशांत खडसे, सुप्रसिद्ध नाट्य लेखक, दिग्दर्शक, तथा नाट्य कलावंत संजय भाकरे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, महालक्ष्मी मंदिर समितीचे प्रमुख डॉ. महेंद्र कडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखा अधिकारी प्रवीण भानुसे, सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार, समाजसेवक मोहनराव वाडीभस्मे, पत्रकार योगेश बढे, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रमोद फटिंग, समाजसेवक बाबासाहेब घंगारे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राव साहेब, शामसुंदर सोनटक्के, तिरुपती बँकेचे माजी व्यवस्थापक संजय पाटील, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव सुरेश रेवतकर, कमल फाउंडेशनचे संस्थापक सहसचिव रमेश भिशीकर, कमल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य प्रशांत अंबारे, संस्थापक सदस्य तथा कार्यकारी अभियंता शेखर गिरी, उपाध्यक्ष दिनेश ठाकरे, कमल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य मोरेश्वर काकडे, खजिनदार आदित्य जांभेकरआणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सेवा समितीतर्फे गुलाब पुष्प घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन निवेदक सारंग माष्टे व नेहा श्रीवास्तव यांनी केले. आभार सेवा समितीचे सचिव गजानन काकडे आणि श्यामसुंदर गोहकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सेवा समितीचे खजिनदार प्रमोद दंडारे, सदस्य प्रभा दंडारे, सुनीता दाभाडे, उपाध्यक्ष सुरेंद्र टिंगने, विधी सल्लागार जयस्वाल, सदस्य मधुकरराव बैतुले, रमेश गणोरकर, विजयकुमार पाटील, राजेंद्र लुले, राजेंद्र फनीभरे,भालचंद्र वाते, निश्चल देशपांडे,नरेश गावंडे, पलाश राया, पवन फुलमाळी, दिनेश तभाने इत्यादींनी परिश्रम घेतले.

    कार्यक्रमानंतर नाश्ता तसेच चहाची व्यवस्था करण्यात आली होती. ‘दीपावली पहाट,’ साठी सेवा समितीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे सेवा समितीच्या वतीने आणि कमल फाउंडेशन च्या वतीने सतिश दाभाडे यांनी जाहीर आभार मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!