नागपुर येथील कमल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

    0
    4

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित काळाची गरज लक्षात घेऊन रूग्ण सेवेचा दिशेने पहिले पाऊल टाकत कमल फाउंडेशनने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराने एक स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली आहे. अशा शब्दांत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नागपुर येथील जय दुर्गा हाऊसिंग सोसायटीच्या समाज मंदिरामध्ये कमल फाउंडेशनच्या वतीने कामठी रोड नागपूर येथील सुप्रसिद्ध तिरपुडे ब्लड बँकेचे सहकार्य घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

    रक्तदान शिबिराचे औपचारिक उद्घाटन विधान परिषदेचे सदस्य आणि कमल फाउंडेशनचे हितचिंतक संजय भेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक रमेशभाऊ भंडारी, नगरसेविका विशाखाताई मोहड, माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिंगारे, मनरेगाचे सहाय्यक संचालक प्रशांत ढाबरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रावसाहेब, चित्रकार प्रकाश बेटावर, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रमोद फटिंग, इंडियन ऑइलचे व्यवस्थापक केदार, तिरुपती बँकेचे माजी व्यवस्थापक संजय पाटील, कमल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य मोरेश्वर काकडे, दिनेश ठाकरे, शेखर गिरी, आदित्य जांभेकर, रमेश भिशीकर, सुनिता दाभाडे, सायली दाभाडे, प्रशांत अंबारे, सेवा समितीचे ज्येष्ठ सदस्य मधुकरराव बैतुले, सेवा समितीचे खजिनदार प्रमोद दंडारे, सचिव गजाननराव काकडे, भालचंद्र वाते, राजेंद्र फणीभरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्यामसुंदर गोहकर, राजेंद्र लुले सेवा समिती सदस्य निश्चल देशपांडे आणि प्लास राया उपस्थित होते.

    कमल फाउंडेशनच्या वतीने तिरुपती ब्लड बँकेच्या व्यवस्थापकांचे आणि सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. पाहुण्यांनी कमल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.कमल फाउंडेशनने सर्वांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश दाभाडे यांनी केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!