Homeसेवाव्रती स्व. पोकरमल उमाशंकर खेतान यांचा अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित ‘अग्रविभूति’ पुरस्काराने बहुमान

सेवाव्रती स्व. पोकरमल उमाशंकर खेतान यांचा अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित ‘अग्रविभूति’ पुरस्काराने बहुमान

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पश्चिम विदर्भातील जुने काळातील प्रतिष्ठित व्यवसायिक आणि दानशूर, सेवाव्रती उमाशंकर पोकरमल खेतान यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून महाराजा अग्रसेन यांचा जयंती उत्सवात मरणोपरांत प्रतिष्ठित’अग्रविभूति’ पुरस्कार प्रदान करून खेतान यांना गौरविण्यात आले. अकोला अग्रवाल समितीकडून महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात खेतान कुटुंबियांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक पवन सराफ, संभाजीनगरचे उद्योजक डॉ.सुशील भारुका, अकोला अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेंद्र खेतान, सचिव विनोद अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील सेवाभावी व्यक्तीमत्व व दानवीर स्व.पोकरमल खेतान यांना जाहीर झालेला ‘अग्रविभूति’ पुरस्कार त्यांचे ज्येष्ठ पुत्र, उद्योजक आणि अकोला जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान तसेच गोविंद खेतान, हेमंत खेतान, प्रतीक खेतान, ममता खेतान, शिल्पा खेतान, मोनिका खेतान, हरीश खेतान व विनोद खेतान यांनी स्विकारला.यावेळी खेतान कुटुंबियांना स्मृतिचिन्ह मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजीव बजाज यांनी ‘अग्रविभूति’ मानपत्राचे वाचन केले.

मानपत्रात नमूद केले आहे की स्व. पोकरमल उमाशंकर खेतान एक सेवाभावी व्यक्तित्व होते. त्यांना आपल्या हयातीत अनेक रचनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजातील अडीअडचणी दूर करून समृद्ध समाज निर्माण करण्याचे कार्य केले. वडील उमाशंकर खेतान यांच्या नावाने अकोला शहरात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय स्थापन केले आणि ते आजही सुस्थितीत संचालित आहे.

परिवारातील बहुतांश सदस्य उद्योग आणि व्यापारासोबत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन सेवाभावी कार्य करीत आहे.मानपत्रात रमाकांत खेतान यांची मुलगी डॉ. पूजा खेतान यांच्या सुमिरमा फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक आणि वैद्यकीय चिकित्सा संबंधी उपक्रमाचा आवर्जून उल्लेख केला आहे. या सर्व समाजाभिमुख कार्याची दखल घेत समस्त अग्रवाल समाजाकडून खेतान कुटुंबियांना मानपत्र प्रदान केले आहे.स्व. पोकरमल उमाशंकर खेतान यांना मरणोपरांत सन्मानित केल्याबद्दल रमाकांत खेतान यांनी अग्रवाल समिती आणि समस्त अग्रवाल समाजाचे आभार मानले. सोहळ्यात मोठ्या संख्येने अग्रवाल समाजातील गणमान्य समाज बांधव, प्रतिष्ठित व्यावसायिक व उद्योजक आणि खेतान कुटुंबियांचे स्नेहीजण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular