Homeउद्या श्री क्षेत्र धारगड यात्रा महोत्सवात महाप्रसाद ! अकोला अर्बन बँक...

उद्या श्री क्षेत्र धारगड यात्रा महोत्सवात महाप्रसाद ! अकोला अर्बन बँक कर्मचाऱ्यांचे आयोजन

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : समाजाभिमुख उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या दि अकोला अर्बन बँक कर्मचारी वृंद, अकोला यांच्या वतीने श्री क्षेत्र धारगड यात्रा महोत्सवानिमित्त उद्या रविवार, दि.३० ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भातील श्री क्षेत्र धारगड हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून यात्रेत शहरी व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक-भक्त येथे दर्शनासाठी येतात. यात्रेकरूंना दुर्गम भागात भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने बँकेच्या कर्मचारीवृंदाने सुरू केलेला महाप्रसाद उपक्रम गेल्या २७ वर्षांपासून अखंडपणे राबविण्यात येत असून दरवर्षी हजारो भाविक-भक्त याचा लाभ घेत आहेत.

अकोला अर्बन बँकेचा विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. श्रद्धा, सेवा आणि समर्पणाची परंपरा जपत राबविण्यात येणारा हा महाप्रसाद उपक्रम भाविकांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular