अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील अँड.पवनेश अग्रवाल आणि त्यांच्या दिव्यांग पत्नी यांच्यावर कटकारस्थान रचून प्राणघातक हल्ला प्रकरणीन्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राने पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. तब्बल ८ महिन्यापर्यंत तपास केल्यानंतर मुर्तीजापूर पोलिसांनी या प्रकरणी रितेश नानकराम नेभनानी, रवि नानकराम नेभनानी, दिपक जगदीश नेभनानी,शुभम जगदीश नेभनानी, प्रथम मनोज श्रीवास, सतीश दत्तू टाकरे व मनोज बाबूराव गुप्ता यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता अन्वये 143,149,323,341504 आणि 506 कलमे लावून आरोप पत्र दाखल केले आहे.
अकोला येथील विधिज्ञ अँड.पवनेश अग्रवाल आपल्या दिव्यांग पत्नी व १४ महिन्याच्या बाळासोबत अमरावती येथून अकोल्याकडे येत असताना, आरोपपत्रातील आरोपींनी बेदरकारपणे गाडीला ओव्हरटेक केले. यावरून अँड अग्रवाल यांनी विचारणा केली असता, त्यांच्या सोबत वाद घातला. तेव्हा अग्रवाल यांनी स्वतःसह कुटुंबाचा बचाव केला होता.पण आरोपींनी कटकारस्थान रचले आणि मुर्तीजापूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ गाडी थांबवून अग्रवाल दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अग्रवाल जखमी झाले. या हल्ल्यात अग्रवाल यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याचे ब्रासलेट दिपक जगदीश नेभनानीने हिसकावून घेतले. नेभनानी कुटुंबातील रवी नेभनानी आणि नानकराम नेभनानी यांचा जावई महाजन यांनी कट रचून प्राणघातक हल्ला केला, अशी तक्रार अँड अग्रवाल यांनी २४ एप्रिल २०२३ रोजी मुर्तीजापूर पोलिस ठाण्यात दाखल केली.
या घटनेनंतर अकोला वकिल संघाने निषेध व्यक्त केला. जिल्हा न्यायालयपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयपर्यंत मोर्चा काढला आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
जवळपास 8 महिन्याच्या तपासानंतर मुर्तीजापूर पोलिस ठाण्याने न्यायालयात आरोपपत्र केले. मात्र यामध्ये अँड अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली गेली नाही. तर राजकीय दबावातून आरोपींना पाठिशी घालण्यात आल्याचा आरोप अँड.अग्रवाल यांनी केला आहे.
विशेष म्हणजे आरोप पत्र 60 दिवसात दाखल करणं कायद्याने बंधनकारक असताना, आठ महिन्यानंतर आरोप पत्र दाखल केले आणि आरोपपत्रातही भादवी कलम 130 B,392, 394, 395 आणि पास्को क़लम लावण्यात आले नाही. एका विधीज्ञावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हे राजकीय नेत्यांचे जवळचे नातेवाईक असून, सत्ताधारीसोबत असलेले संबंध आणि धनशक्ती यामुळे पोलिसांनी तपासाची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.