अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : भारत देशाचा ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण उत्साहात व राष्ट्रभक्तीमय वातावरणात अकोला जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान यांच्या हस्ते करण्यात आला.अग्रसेन भवनात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित समाजातील मान्यवरांनी ध्वजवंदन केले.

ध्वजारोहण कार्यक्रमात शिवसेना कायदे विभागाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व कल्याण संघटना नई दिल्ली या संस्थेच्या विदर्भ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अधिवक्ता पवनेश अग्रवाल यांचा सहकुटुंब अग्रवाल समितीकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अग्रवाल समितीचे ‘विशेष आमंत्रित सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष महेन्द्र खेतान, उपाध्यक्ष पुरुषोत्तम गुप्ता, व संतोष अग्रवाल सचिव विनोदकुमार अग्रवाल व समितीचे सर्व सदस्य तसेच विशेष आमंत्रित अतिथी उमेश खेतान, निरंजन अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना बाजोरिया तसेच अग्रवाल समितीचे आणि महिला मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.