Sunday, May 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात महिलेचे शोषण ! पोलिस शिपाईच्या विरोधात गुन्हा दाखल

अकोल्यात महिलेचे शोषण ! पोलिस शिपाईच्या विरोधात गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्यूज : अकोलासह महाराष्ट्रात दिवसागणिक पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा जात असताना अकोल्यात एका पोलीस शिपाईच्या विरोधात एका महिलेने शारिरीक शोषण करण्याचा गंभीर आरोपसह कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.

संग्रहित छायाचित्र

अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सचिन केशव गायकवाड याच्याविरोधात एका महिलेने लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, मानसिक छळ करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत तक्रार महिलेने दिली आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. २०८/२०२६ अन्वये बीएनएस कलम ६९, ३५२, ३५१ (२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्याद प्राप्त होताच पोलीस निरीक्षक संजय गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती दिली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत.
कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे गैरवर्तन होणे अत्यंत गंभीर असून त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. असे निरीक्षणही वरिष्ठांकडून नोंदविण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!