Saturday, April 11, 2026
No menu items!
No menu items!
Homeआता चिंता मुक्त रहा ! अकोल्यात मुलांच्या शिक्षणाला 'सहयोग’ची संगत

आता चिंता मुक्त रहा ! अकोल्यात मुलांच्या शिक्षणाला ‘सहयोग’ची संगत

अकोला दिव्य न्यूज : काळानुरूप सर्वंच क्षेत्रांतसोबतच शिक्षण क्षेत्रात बदल होत असलेल्या बदलांमुळे, मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतांना पालकांमध्ये चिंतेचे कारण असू शकते. मात्र अकोला शहरात चिंता मुक्त होऊन पाठवा. कारण अकोल्यात आहे आता ‘सहयोग’ची साथ ! होय मुलांच्या खाण्यापिण्यासह सुरक्षित राहण्याचा सुविधेसह त्यांच्या आरोग्य आणि वागणुकीवर काटेकोर निगराणी राखण्याच्या जबाबदारीचे भान ठेवूनच ‘सहयोग बॉईज हॉस्टेल’ उपलब्ध झाले आहे.

अकोला शहरातील एल.आर.टी कॉलेज परिसरातील गजानन हॉस्पिटल जवळील रामनगर भागात वसलेले हे हॉस्टेल अकोल्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (मुलं) आरामदायी आणि शिस्तबद्ध निवासाचा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. हॉस्टेलमध्ये पूर्णपणे वातानुकूलित (AC) सुविधा असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत दिवसातून दोन वेळा पौष्टिक आणि घरगुती जेवण दिले जाते. याशिवाय सकाळी चहा-नाश्ता, दुपारी हाय-टी आणि रात्री दूध अशी अतिरिक्त सोयही करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लॉन्ड्री सुविधा उपलब्ध असून, स्वच्छता आणि शिस्त यावर विशेष भर देण्यात आला आहे. हॉस्टेलमध्ये कडक नियमांसह उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनुभवी व्यवस्थापन टीमकडून विद्यार्थ्यांवर सतत लक्ष ठेवले जात असल्याने पालकांना चिंता करण्याची मुळीच गरजच नाही. सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त अशा या हॉस्टेलमुळे अकोल्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रवेशासाठी संपर्क : 88889 92277

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!