Friday, May 1, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात 'खंडणी'ची तक्रार ! .... कारवाईकडे लक्ष

अकोला अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात ‘खंडणी’ची तक्रार ! …. कारवाईकडे लक्ष

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहर आणि जिल्ह्यातील क्रशर व खदान संचालकांकडे अकोला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने रोख रक्कमेची मागणी केली आहे, अशा आशयाची लेखी तक्रार अकोला जिल्हा खदान व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विवेक बिजवे यांनी अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.एमआयडीसी पोलिसांनी सदर तक्रार तपासात ठेवली आहे. नियमबाह्य पद्धतीने पैशांची मागणी करणे, याला ‘खंडणी’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून, अलिकडच्या काळात भ्रष्टाचार चरमशिगेवर पोहचला असल्याचे दररोज ऐकण्यात येते आहे. दरम्यान अपर जिल्हाधिकाऱ्यांनीं आरोप चुकीचा असल्याचे सांगितले आहे. आता जिल्हाधिकारी आणि जनप्रतिनिधी काय भुमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अकोला दिव्य छायाचित्र

अकोला जिल्हा खाण आणि क्रशर उद्योगिक संघाचे अध्यक्ष विवेक बिजवे यांनी सर्व खदान ऑपरेटर्सच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी तक्रारीत असे म्हटले आहे की, अकोला जिल्हाधिकारी हे स्वतः खाण विभागाचे नियुक्त प्रमुख असून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे संबंधित विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी १९ मार्च रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून संघटनेच्या प्रत्येक सदस्याकडून तुम्ही किती रक्कम वसूल करुन देणार हे सांगा, असे सांगितले.

तेव्हा बिजवे म्हणाले की, शासकीय देय रक्कम पूर्णपणे जमा केली आहे. कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. तेव्हा संतापलेले अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, गायकवाड म्हणाले, माझ्यासाठी काय उरले आहे ? हे स्पष्ट करा. बिजवे यांनी उत्तर दिले की मार्च अखेर ते सदस्यांशी बोलतील. तेव्हा गायकवाड संतापून म्हणाले, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, नाहीतर मला कारवाई करावी लागेल त्यानंतर, २१ मार्च रोजी अकोट तालुक्यात अनेक खाणींची पाहणी करण्यात आली. या बेकायदेशीर कारवाईचा निषेध केल्यावर, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यानेच आदेश दिला होता.

बोरगाव मंजू येथील एका खाणीची स्वतः गायकवाडांनी २२ मार्चला पाहणी केली. सर्वांवर बेकायदेशीर कृत्यांचा आरोप करत, त्यांनी प्रत्येक खाण मालकाकडून १५ हजार रुपयांची मागणी केली. दहा खाणचालकांनी पैसे दिले, परंतु उर्वरित खाणचालक पैसे देऊ न शकल्याने, त्यांनी २५ मार्च रोजी बिजवे यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. खाणचालक शुभम तायडे यांना २९ मार्चला पातूर तालुका कार्यालयात बोलावण्यात आले, जिथे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिली. १ एप्रिल रोजी, बिजवे यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा फोन आला, ज्यात त्यांनी नाराजी व्यक्त करत यापुढे कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे जाहीर केले.असं तक्रारीत म्हटले आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागणुकीने खाण व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिजवे व खाण संचालकांनी आरोप केला आहे की, गायकवाड हे खाण व्यावसायिकांवर दबाव आणण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांनी तक्रारीत नमूद आरोप चुकीचे असल्याचे म्हटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!