Friday, April 3, 2026
No menu items!
No menu items!
Homeलोकस्वातंत्र्य ! अकोल्यात साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानपत्र व पुरस्काराने सन्मानित

लोकस्वातंत्र्य ! अकोल्यात साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानपत्र व पुरस्काराने सन्मानित

अकोला दिव्य न्यूज : तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगणही ठेंगणे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे” या वैश्विक संकल्पनेतून महिला शक्तीच्या उल्लेखनीय योगदानाला सकारात्मक प्रोत्साहन म्हणून जागतिक महिला दिनाच्या औचित्त्याने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून महिलांचा सन्मान सोहळा घेऊन विविध क्षेत्रातील अग्रेसर ३९ महिलांचा लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. उपस्थित १५० पेक्षा जास्त महिलांना साडी चोळी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पत्रकार महासंघाचा मासिक ५५ वा विचारमंथन मेळावा आणि महिला सन्मानाच्या विलोभनीय भव्य दिव्य कार्यक्रमात जवळपास ३५० जणांची उपस्थिती म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसादाची एक पावती होय.

ज्येष्ठ साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक सेवाव्रती देवकाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका सिमाताई झावरे, राज्य अन्न आयोगाच्या सदस्या व समता परिषदेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षा मायाताई ईरतकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राज्य पदाधिकारी मंदाताई देशमुख या प्रमुख अतिथी तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी अपर्णा शिरिष धोत्रे,अर्चना श्रीकृष्ण शर्मा, पल्लवी दिवेकर, नितीशा कोठारी, डॉ.कल्याणी पवित्रकार, स्नेहल ढवळे, कल्पना देशमुख, प्रा‌.डॉ.दिपाली सोसे, वृंदा काटकर, राजश्री देशमुख, हेमाताई हुशे, डॉ शारदा अग्रवाल व डॉ.प्रतिक्षा देशमुख (खामगाव) अंशुल गुप्ता, किर्तनकार कल्याणी मुटे ( हिंगणघाट) पिंकी हिरानंदानी, सुमय्या अली,सौ सुनंदा वर, नयना सरोदे, वंदना पिंपळखरे आणि विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा ‘लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव’ या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

स्मृतीचिन्ह,शाल, साडी चोळी व पुष्पगुच्छ असे त्याचे स्वरूप होते. अर्चना पुष्पराज गावंडे, प्रतिभा प्रदिप खाडे यांचासह उपस्थित १५० पेक्षा जास्त महिलांना सन्मानपत्र व साडी चोळी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी साहेबराव तायडे यांची भारतमाता समता स्मृती शिल्पांची प्रदर्शनी, आरंभीची तृप्ती बोंते यांच्या विद्यार्थीनी दृष्टी इंगोले व सरकटे यांची नृत्य गणेश वंदना व स्वागत गीत तसेच विनायक पांडे यांचा शंखनाद यामुळे कार्यक्रम विलोभनीय ठरला. महिलांनी सत्कारानंतर आनंद व्यक्त करून हृदयस्पर्शी प्रतिक्रिया व्यक्त करीत कौतुकासह लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला शुभेच्छा दिल्या.
निवेदिका व मंच संचालक जया भारती यांच्या संचलनात झालेल्या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे, सचिव राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे, सिध्देश्वर देशमुख, गिरधारीलाल सारडा (वाशिम) निशाली पंचगाम, पंजाबराव देशमुख, डॉ.नितीश अग्रवाल,रामराव देशमुख, (खामगाव)किशोर मुटे,(हिंगणघाट)डॉ.शंकरराव सांगळे,अंबादास तल्हार, महादेव लूले, अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेन्द्र काळे, रमेश समुद्रे, अमित इंगळे, दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट,गजानन थोरात,डॉ.विनय दांदळे,सुरेश पाचकवडे,नारायणराव अंधारे, प्रा.मोहन वाघ,अशोक शिरसाट,अॕड राजेश कराळे,ॲॕड नितीन धुत, प्रा.विजय काटे,वाशिम जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, सागर लोडम, मनोहर मोहोड आणि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली बाहेकर, दिलीप नवले, पंजाबराव वर,सतिश देशमुख,श्रीकृष्ण माळी, आशिष वानखडे,मोहोड यांनी परीश्रम घेतले.आभार प्रदर्शन किर्ती मिश्रा यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!