Sunday, April 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात आरोपी महिलेकडे ASI जाधवने केली चक्क शरीर सुखाची मागणी

अकोल्यात आरोपी महिलेकडे ASI जाधवने केली चक्क शरीर सुखाची मागणी

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील जेफ्री एपस्टिन उपाख्य भोंदू बाबा व महाठग अशोक खरात याचे बिभित्स आणि किळसवाणे किस्से बाहेर येत असताना, सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी असलेल्या अकोला पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाने एका आरोपी महिलेकडे चक्क पोलीस ठाण्यात शरीर सुखाची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रक्षक होण्याऐवजी भक्षक झालेल्या या चेकाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मात्र यामुळे आता पोलिसांच्या ताब्यात कोणीही सुरक्षित नाही. हे अधोरेखित होते आहे.

पोलीस कोठडीतील महिलेकडे ‘तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी पाठव, १० हजार रुपये देतो’ अशी धक्कादायक मागणी कर्तव्यावरील पोलिसांनी पोलीस ठाण्यातच केल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित केले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आई) राजेश जाधव असे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराची विविध प्रकरणे सध्या चर्चेत आहेत. यातील आरोपींवर कारवाई सुरू असतानाच पोलीस तपासामध्ये विविध धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अकोला शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला.

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अकोला पोलिसांनी एका महिलेला अटक केली. या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यामुळे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आरोपी महिलेला ठेवण्यात आले. यादरम्यान, पोलीस ठाण्यातील कर्तव्यावरील एएसआय राजेश जाधव याने महिलेकडे काल रात्री शरीरसुखाची मागणी केली. पैशांचे आमिष दाखवले. मुलीला शरीरसुखासाठी पाठव, अशी धक्कादायक मागणी त्याने केली. संबंधित महिलेने या प्रकाराची तक्रार आज वरिष्ठांकडे केली. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळखळ उडाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!