Friday, March 27, 2026
No menu items!
No menu items!
Homeतब्बल 2 आठवडे अन् एक क्लिक ! वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर....

तब्बल 2 आठवडे अन् एक क्लिक ! वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर….


अकोला दिव्य न्यूज : एका कच्च्या रस्त्यावर एक लिंक्स (Lynx) त्याच्या पायांवर ताठ उभा आहे. त्याने आपला एक पंजा वर उचलून एका लहान उंदरासारख्या प्राण्याला हवेत उडवले आहे.अशी पार्श्वभूमी असलेल्या एका खेळकर आयबेरियन लिंक्सच्या (Lynx) फोटोला यावर्षीचा ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2026’ पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्ट्रियाचे फोटोग्राफर जोसेफ स्टेफान यांनी हा फोटो काढला आहे. ‘फ्लाईंग रोडन्ट’ (Flying Rodent) हे या फोटोचं नाव आहे. स्पेनच्या सियुदाद रिअल प्रांतातील ‘Torre de Juan Abad’ येथे 2 आठवडे राहून हा फोटो त्यांनी काढला आहे. हा फोटो काढण्यासाठी ते अनेक दिवस एका जागी लपून प्रयत्न करत होते. त्या दरम्यान एके दिवशी एक तरुण लिंक्स प्राणी अचानक तिथे त्याची शिकार घेऊन आला आणि त्याने ती शिकार हवेत फेकत झेलण्यास सुरुवात केली.

जोसेफ स्टेफन म्हणाले, ‘तो लिंक्स सुमारे 20 मिनिटं त्याच्या शिकारसोबत खेळण्यात मश्गुल होता. कधी कधी तो मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून त्या शिकारकडे नजर रोखून बघायचा. त्याचा खेळ बघून असं वाटलं की आता ‘तो उंदीर आता उडायलाच लागेल. मकाहीवेळाने त्या लिंक्सचा या खेळातला रस संपला आणि तो त्याची शिकार घेऊन झुडपात खायला निघून गेला.

लिंक्स हा प्राणी मांजराच्या प्रजातीतील असून तो बिबळ्यापेक्षा लहान आणि रानमांजरापेक्षा मोठा असतो. अमेरिका व यूरोपच्या उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आणि आशियाच्या उत्तर व मध्य भागांत हे प्राणी आढळतात.आयबेरियन लिंक्स ही जगातील सर्वात दुर्मिळ वन्य मांजरांपैकी एक प्रजात आहे आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, 100 पेक्षाही कमी लिंक्स शिल्लक राहिले होते. त्यामुळे ही प्रजात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती.

दीर्घकालीन संवर्धन आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमुळे, या प्रजातीची संख्या वाढली. आता 2 हजारांहून अधिक आयबेरियन लिंक्स आहेत. तरीही, आययूसीएनच्या (International Union for Conservation of Nature) वर्गीकरणानुसार, हे लिंक्स अजूनही ‘असुरक्षित प्रजाती’ (Vulnerable Species) समजले जातात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!