अकोला दिव्य न्यूज : अकोला महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य नगरसेवक सुनील इन्नाणी यांचा मारवाडी संमेलन तथा मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक सुनील इन्नाणी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न होतील. अगदी त्याच दृष्टीने माझी पावले ही विकासात्मक मार्गाने चालतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या नियुक्तीची श्रेय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.बाळासाहेब आंबेडकर यांना दिले.

सत्कार कार्यक्रमात मारवाड़ी सम्मेलनाचे गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, जयप्रकाश चांडक, श्याम शर्मा, सुरेश अग्रवाल (गुरुजी), कटारिया, श्रीकांत गोयनका, कुंजीलाल सोनारीवाल, संतोष छाजेड, तसेच भुषन अग्रवाल, सर्वेश अग्रवाल सोनालावाला, नमन खंडेलवाल, प्रदीप रांदड, रोहीत रुंगटा, निलेश बोर्डिवाला, हरीष खंडेलवाल, निर्मल समदाडीया, अभिजीत गोयनका, सुमीत गोयनका आदी उपस्थित होते.
