Friday, March 13, 2026
No menu items!
No menu items!
HomeCA परिक्षेत अकोल्यातील M-Square Tutorials चा डंका !

CA परिक्षेत अकोल्यातील M-Square Tutorials चा डंका !

अकोला दिव्य न्यूज : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंड ऑफ इंडियाकडून जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल अर्थात CA Foundation परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, अकोला शहरातील M-Square Tutorials मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचताना एम स्क्वेअर ट्युटोरियल्सचा झेंडा फडकवला.

अकोला शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून अत्यंत माफक पैसात शिकवणी देणारी संस्था म्हणून विश्वास व नावलौकिक असलेल्या M-Square Tutorials संचालक मयंक थानवी यांनी CA सारथी सोबत सुरू केलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील CA INTER परिक्षेत अकोला जिल्ह्यातील टॉपर M-Square Tutorials चा आला आहे.विशेष म्हणजे या निकालाने CA कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात एम स्क्वेअर ट्युटोरियल्सने आपले स्थान मजबूत केले आहे.

CA सारथी कडून CA शुभम चांगोईवाला (AIR 22) यांच्या मार्गदर्शनाखाली सागर राजदेव (४०४), यशवी नैमिष सेजपाल (२६४), समर्थ सोनवणे (२४४) यथार्थ रूपेश बत्ताड, जान्हवी राजेश ढोले,अनुश्री निरंजन तायडे, प्रियांशी अश्विन भाटी, हर्षित अग्रवाल या विद्यार्थ्यानी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे की या निकालात अकोल्यातील सर्वोच्च गुण अर्थात ६०० पैकी ४०४ गुण आणि ६ पैकी ५ विषयांमध्ये ‘Exemption’ तसेच Advanced Accounting मध्ये १००पैकी ८२ गुण Auditing and Ethics मध्ये १०० पैकी ७५ गुण प्राप्त करणारे विद्यार्थी एम स्क्वेअर ट्युटोरियल्सचे आहेत.

जानेवारी २०२७ मध्ये CA Inter तसेच जानेवारी २०२७ साठी CA Foundation करिता सराव परीक्षा मालिका (Test Series) मे २०२६ मध्ये बॅच सुरू होत असून १६ मार्चपासून प्रवेश सुरू होणार आहे. यासोबतच मे २०२६ बॅचसाठी उजळणी सत्रे (Revision sessions) सध्या सुरू आहेत, प्रवेश निश्चित करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी

एम स्क्वेअर ट्युटोरियल्स, देशोन्नती प्रेस जवळ, गोरक्षण रोड, अकोला किंवा 93703 35455 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!