अकोला दिव्य न्यूज : हिंदू जागरणाच्या दिशेला नवी ऊर्जा व चेतना प्रदान करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सनातन संस्कृती, सनातन धर्म व सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर रविवार १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता या संमेलनाची सुरुवात भागवत कथा प्रवक्ता श्रीराम शाखी गदाधर यांच्या आशीर्वचनाने होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून विद्या भारती विदर्भ प्रांत सहमंत्री विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी आणि साहित्य भारतीच्या प्रांत सहसंघटक व महिला वक्ता मोहिनी मोडक संमेलनाला संबोधित करणार आहेत.

समाजात नव्या ऊर्जेचा संचार करण्यासाठी अकोला शहरातील तापडिया नगर, महाजनी प्लॉट, केडिया प्लॉट या परिसरातील सकल हिंदू समाजाने पुढाकार घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे गठन करून सर्वाच्या सहमतीने आयोजन समितीच्या अध्यक्षपदी माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि धार्मिक क्षेत्रात सतत कार्यरत व सक्रिय सहभाग राखणारे पुरुषोत्तम मालाणी यांची निवड करण्यात आली.
यासोबतच उपाध्यक्ष म्हणून वसंतराव खोटरे,अपर्णा धोत्रे, हरीश अण्णा मिरजामले तर सचिव म्हणून अनिता राजगुरे, निधी संकलन प्रमुख, गिरीश तोष्णीवाल तसेच सदस्य म्हणून बाबासाहेब पाठक, सुरेश माहेश्वरी, प्रकाश काकड, डॉ.नरेंद्र पावडे, प्रकाश लहाने, अंजली पाटणकर, डॉ कुँवर तोष्णीवाल, राजीव मुंदडा, नितीन गट्टाणी, रणजीत सिंग ओबेरॉय, नरेश खेतान, श्रीकर सोमण, संजय अग्रवाल, अँड मोहन मोयल, सागर कनोजिया, नंदकिशोर द्रोण, कैलास लगा, राजेंद्र अग्रवाल, अँड.गोपाल सारडा, संजय मालपाणी, सागर शेगोकार परमजित सिंग घुमन, गितांजली शेगोकार,लिना हातेकर, रमेश अग्रवाल, पुरुषोत्तम राठी, शैलेश कुलकर्णी, सुनील देशमुख, सुनील कु-हेकर, मंजुताई मनभेकर, भगवानदास तोष्णीवाल, चंदू गोळे, राम मित्तल, डॉ.महेंद्र चांडक,रमेश गट्टाणी, अशोक हेडा, डॉ.आर.बी.हेडा, बाँकेबिहारी गर्ग,अजय झंवर, राजकुमार भट्टड, सुरज देशमुख, जीतु गांधी, नीती मालु, चंदूभाऊ अडतिया, प्रविण हिवराळे, अनिल चांडक, डॉ.आशिष पानपलिया आरती लढ्ढा, निकिता देशमुख, नगरसेवक पवन महल्ले, प्रकाश घोगलिया, नगरसेवक आरती घोगलिया, डॉ.चंद्रकांत पनपालिया, वैजयंतीताई पाठक यांचा समावेश आहे.
