Saturday, March 7, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कशीश खान

अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कशीश खान

अकोला दिव्य न्यूज : अकोला महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी कशीश खान यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी केलेली ही निवड म्हणजे एका सामान्य कुटुंबातील व तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन कार्यरत व पक्षांसोबत निष्ठावंत असलेल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी कशीश खान यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले. या नियुक्तीने संघटन मजबूत करण्यासाठी तसेच महिला काँग्रेसचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विचारधारेनुसार तसेच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कार्यरत आहे.

अकोला शहरात त्याच धर्तीवर महिला काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी कशीश खान पुढाकार घेणार,असे महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सव्वालाखे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जनाधार मिळवून देण्यासाठी तसेच संघटन विकासासाठी प्रभावी कामगिरी करणार अशी ग्वाही, नवनिर्वाचित अध्यक्ष कशीश खान यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!