अकोला दिव्य न्यूज : समाजात सांस्कृतिक परंपरांचे जतन व सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी संस्कृती संवर्धन समिती सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर संस्कृती संवर्धन समितीची २०२६–२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, उपाध्यक्ष हरिशभाई अलिमचंदानी, मंगेश वानखडे व नवनियुक्त संयोजक समीर थोडगे उपस्थित होते.

यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने २०२६–२०२७ या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली समितीच्या वतीने वर्षभरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६, अखंड भारत दिनानिमित्त जाहीर व्याख्यान ( दि.९ ऑगस्ट २०२६), महालक्ष्मी आरास स्पर्धा, सामूहिक तुळशी विवाह तसेच विविध प्रांतातून अकोल्यात स्थायिक झालेल्या नागरिकांना एकत्र आणणारे भारत भारती संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या वेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन श्री समर्थ पब्लिक, रणपिसे नगर येथे करण्यात आले होते. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समितीचे उपक्रम अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संस्कृती संवर्धन समितीच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संयोजक समीर थोडगे, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, सहसंयोजक राम भिरड, कोषाध्यक्ष शरद वाघ यांचा समावेश आहे. तर स्वागत समिती अध्यक्षपदी ब्रिजमोहन चितलांगे यांच्या सोबत उपाध्यक्ष डॉ. पार्थसारथी शुक्ल,मंगेश वानखडे, हरिश अलिमचंदानी, अरविंद देठे, मनिष चंदनानी, विनोद देव, अनिल गावंडे आणि स्वागत समिती महिला उपाध्यक्षा अर्चना शर्मा, पल्लवी रावणकर, डॉ.राधा पुरी, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, मीनाक्षी आपोतीकर, लता राठोड तसेच महिला संयोजिका रेवती पांडे, सोनिया तऱ्हाळकर, मनीषा भुसारी, जयमाला खेडकर, विजया देशमुख, पुष्पा वानखडे, डॉ. स्नेहा गोखले, रुपाली धोत्रे, ऋतुजा पांडे यांचा समावेश आहे.
प्रचार व प्रसार समितीचे प्रमुख म्हणून अभयसिंग राजपूत आहेत. कार्यकारिणी सदस्यपदी विनोद जकाते, प्रशांत पाटील, खेमराज भटकर, रूपेश वाखारकर, पंकज सादराणी, पंकज सहगल, तुषार गोतमारे, विनोद देव, जय राणे आणि मार्गदर्शक सदस्य नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, डॉ.राजकुमार हेडा, अँड.मोतिसिंह मोहता, महेश जोशी, हेमेंद्र राजगुरू, चित्रा बापट, निलेश देव, आनंद बांगड, पुरुषोत्तम मालाणी, डॉ. प्रविण चव्हाण यांचा समावेश केला आहे.
