Thursday, March 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला कॉंग्रेसने अन्याय करु नये ! 'त्या' निर्णयाप्रमाणे 'हा' निर्णय देखील......

अकोला कॉंग्रेसने अन्याय करु नये ! ‘त्या’ निर्णयाप्रमाणे ‘हा’ निर्णय देखील……

अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका स्वीकृत सदस्य निवडीचे सर्वांना वेध लागले असून राजकीय पक्षाचे नेतृत्व कुणाला संधी देणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान सदस्य निवडीबाबत कॉंग्रेस पक्षाने एक अत्यंत योग्य निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे स्वीकृत सदस्य निवडीत ‘पराभूत’ झालेले बाद ठरले.आता एक महत्त्वाचा एक निर्णय घेणे आवश्यक आहे. तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यालाही संधी नको. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांला संधी दिली जावी. याचा पक्षाला मजबूत करण्यासाठी निश्चित फायदा होईल. भाजप पराभूतांचे पुनर्वसन करणार की धक्कातंत्र वापरत नव्यांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला महानगर कॉंग्रेस पक्षाने एक नवीन पायंडा पाडला तर एक वेगळा मॅसेज जाईल.

काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी एक निर्णय घेतला. संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना अवगत केले. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेल्यांना आता स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही.असाच निर्णय पक्षातील नेत्यांचा नातलगांच्या बाबतीत घेऊन जुन्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी दिली जावी. अशी कॉंग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे.

मनपातील संख्याबळानुसार कॉंग्रेसला केवळ दोनच स्वीकृत सदस्य नियुक्त करता येईल. तेव्हा पक्षासाठी सदैव राबराब राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेऊन सन्मान करावा. पक्षापासून दूर गेलेल्या समाजाचं लक्ष वेधून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच पक्षाने भरपूर देऊनही पुन्हा आपल्याच घरात ही मानसिकता मोडीत काढावी. अकोला कॉंग्रेस पक्षाने एक नवीन सुरुवात करावी. हे सगळं काही कॉंग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेवर सर्व अवलंबून राहील.

संख्याबळानुसार भाजपचे चार व काँग्रेसचे दोन स्वीकृत सदस्य होतील, उर्वरित दोन स्वीकृत सदस्यांसाठी इतर पक्षांना संधी मिळू शकते. शिवसेना ठाकरे गट सहा, वंचित आघाडी पाच, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, एमआयएम तीन, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, महानगर विकास समिती एक व अपक्ष प्रत्येकी एक सदस्य संख्या आहे.

स्वीकृत सदस्यांसाठी नामनिर्देशन पत्र वितरण २ मार्चपासून सुरू झाले. ६ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर करावा लागेल. स्वीकृत सदस्य निवडीसाठी ९ मार्चला सकाळी महापालिकेत सभा आयोजित करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!