Sunday, March 1, 2026
No menu items!
No menu items!
Homeहोलिका दहन उद्या २ मार्चला ! मारवाडी समाजातील 'गणगौर' व इतर धार्मिक...

होलिका दहन उद्या २ मार्चला ! मारवाडी समाजातील ‘गणगौर’ व इतर धार्मिक विधी ४ मार्चला

अकोला दिव्य न्यूज : दरवर्षी फाल्गुनी शुध्द पोर्णिमेच्या दिवशी सायंकाळी करण्यात येणाऱ्या होलिका दहनच्या अनुषंगाने यंदा मतभिन्नता होत आहे.यंदा पोर्णिमेचा कालावधी सोमवार २ मार्चला सायंकाळी ५.५५ वाजल्यापासून मंगळवार ३ मार्च रोजी सकाळी सुर्योदयापुर्वी पर्यंतच आहे. म्हणजेच मंगळवारी सुर्योदयसोबत पोर्णिमा येणार नाही. विशेष म्हणजे मंगळवारी सुर्योदयासोबतच खग्रास चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होतो आहे. यामुळे होलिका दहन सोमवार की मंगळवार,असा प्रश्न उपस्थित होतो आहे.तेव्हा अकोला दिव्याच्या वाचकांसह सर्वसामान्य लोकांना होलिका दहन आणि मारवाडी समाजातील गणगौर व इतर धार्मिक विधी संदर्भात माहिती देत आहोत.

होलिका दहन संवत २०८२ मध्ये, फाल्गुन शुक्ल पौर्णिमा आणि प्रतिपदा साडेतीन प्रहरांपेक्षा जास्त काळ वाढवल्या जात असल्या तरी, धर्मसिंधूमध्ये चंद्रग्रहण दृश्यांनुसार मंगळवारी सकाळपासून सूतक आणि नंतर ग्रहणकाळ असल्याने धर्मसिंधूमध्ये दिलेल्या सोमवार २ मार्च २०२६ रोजी प्रदोष काळात होलिका दहन करणे शास्त्रासम्मत आहे.

सोमवार २ मार्च या दिवशी भद्रा संध्याकाळी ०५:५६ ते रात्री २६:२६ पर्यंत ( मंगळवार ३ तारखेच्या सकाळी ०५:२६) राहील. भद्रा बद्दल, शास्त्रात असे लिहिले आहे की, जर भद्रा निशीथकाळानंतर (मध्यरात्री) पर्यंत चालू राहिली, तर भद्राच्या मुखातून बाहेर पडून प्रदोष काळात होलिका दहन करावी.या वर्षी प्रदोष काळात भद्रा राहणार नाही, म्हणून प्रदोष काळात (सूर्यास्तापासून २ तास २४ मिनिटे) होलिका दहन करणे शास्त्रानुसार आहे पंडित नरेंद्र यांनी या वेळेला दुजोरा देत सोमवारी होलिका दहन करणे शास्त्रसम्मत आहे. मंगळवारी नेहमी प्रमाणे धुरवड/धुळवड साजरी करण्यात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.

सोमवार २ मार्च रोजी होलिका दहन करणे शास्त्रसम्मत आहे आणि मंगळवारी धुळवड साजरी करण्यात अडचण नाही. परंतु मारवाडी आणि काही समाजात होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी गणगौर आणि इतर धार्मिक विधी वा अनुष्ठान केले जाते. परंतु यंदा होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ३ मार्च रोजी सकाळी सुर्योदयसोबत खग्रास चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होतो आहे. तद्नंतर ग्रहणाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळेच होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी गणगौर आणि इतर धार्मिक विधी वा अनुष्ठान यंदा बुधवार ४ मार्चला सकाळी करावे,असं पंडित नरेंद्र यांनी सांगितले.

टीप : धर्मसिंधूमध्ये दिलेली माहिती आणि पंडित नरेंद्र यांनी या अनुषंगाने दिलेल्या माहितीवरून ही माहिती दिली आहे. उपरोक्त माहितीबद्दल अकोला दिव्य कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही.

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!