Wednesday, February 25, 2026
No menu items!
No menu items!
Homeप्रदेश भाजपाने अकोल्याला वगळले ! कार्यकारिणीत 'इतर' पैकी कोणत्याही नेत्याला स्थान नाही

प्रदेश भाजपाने अकोल्याला वगळले ! कार्यकारिणीत ‘इतर’ पैकी कोणत्याही नेत्याला स्थान नाही

अकोला दिव्य न्यूज : गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची निवड होऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील एकाही भाजप नेत्याला स्थान देण्यात आले नाही. याठिकाणी जळगाव जामोद विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री डॉ. संजय कुटे यांचा समावेश केला गेला आहे. अकोला पुर्वचे आमदार सावरकर यांना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी असल्याने त्यांना सरचिटणीसपदावरून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील इतर कोणत्याही नेत्याला पदाधिकारी म्हणून स्थान का मिळाले नाही. हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासोबतच वाशीम जिल्ह्यातील नेत्यांनाही संधी मिळाली नाही.

पश्चिम विदर्भात पाच जिल्ह्यांपैकी अकोला, वाशीम व यवतमाळ या तीन जिल्ह्यांची पाटी कोरीच असून अमरावती व बुलडाणा या दोन जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. अमरावतीचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना उपाध्यक्ष, तर बुलढाणा जिल्ह्यातून आमदार डॉ. संजय कुटे यांना सरचिटणीस म्हणून संधी मिळाली.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केली. नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये एकूण ४३ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, मुख्यालय प्रभारी, मुख्यालय सहप्रभारी, मुख्य प्रवक्ता प्रत्येकी एक आदींसह विविध मोर्चाच्या अध्यक्षांचा समावेश आहे.

अकोला पूर्वचे आमदार सावरकर प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधिमंडळ मुख्य प्रतोद हे मंत्रिदर्जाचे पद दिले.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे देखील ते सहअध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. मतदार याद्यांसंदर्भात पक्षाच्या ‘सर’ समितीवर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आले. इतर जबाबदाऱ्यांमुळे सरचिटणीसपद वगळण्यात आल्याचे बोलल्या जाते. त्यांच्या ऐवजी जिल्ह्यातील इतर नेत्याची प्रदेश कुठल्या पदाधिकारी म्हणून वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, अखेरीस ती फोल ठरली.

वाशीम जिल्ह्याला या अगोदरही प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यावेळीदेखील वाशीम जिल्ह्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!