अकोला दिव्य न्यूज : आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की नंदतारांगणमध्ये दोन रिफ्रॅक्टींग टेलिस्कोप आणि एक साडेतेरा इंचाचा कॅसिन ग्रँन टेलिस्कोपहे उपलब्ध आहेत. त्याची प्राथमिक जबाबदारी कुतूहल संस्कार केंद्राचे संचालक नितीन ओक यांना दिली आहे. परंतु दर्शकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे नंदतारांगण आणि ओक सर यांनी हा उपक्रम आणखी योग्य तऱ्हेने होण्यासाठी यामध्ये काही स्वयंसेवकांना आवाहन केले आहे.

विविध वयोगटातील, चांगलं बोलू शकणारे, कार्यरत शिक्षक, निवृत्त शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, शिक्षण क्षेत्राशी संबंध असलेले किंवा नसलेले आणि यासाठी शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही. अशा व्यक्तींनी ओक यांच्याशी संपर्क साधावा सुरुवातीला काही दिवस त्यांना तिथे स्वयंसेवक म्हणून यावं लागेल याची कोणतीही फी राहणार नाही आणि नंतर जेव्हा त्यांना पूर्ण ज्ञान येईल त्या वेळेला त्यांना यथायोग्य मानधन मिळू शकेल.
व्यक्तिगत रित्या ते आकाश दर्शनाचा कार्यक्रम पण आयोजित करू शकतील. याच्यासाठी निवडल्या जाणाऱ्या आकाश मार्गदर्शकांची संख्या जास्तीत जास्त संख्या दहा जणांची असेल आधी येणाऱ्याला अग्रक्रम दिला जाईल. या मार्गदर्शनात टेलिस्कोप ची काळजी, टेलिस्कोप फोकस करण्याची पद्धत,आकाश निरीक्षणाची ओळख,
नक्षत्रांची ओळख ग्रहाबद्दल माहिती या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध राहतील. नंतर आपल्याकडून महिन्यामध्ये ठराविक दिवशी जास्तीत जास्त तीन तास आणि दहा दिवस इथे आपण द्याल अशी अपेक्षा राहील. आपण संपर्क साधावाआणि या उपक्रमाला सहभाग द्यावा. अधिक माहितीसाठी नितीन ओक, 98906 98139 वर मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
